कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील ५२ हजार शालेय विद्यार्थ्यांना तिरंगा बॅच व गोड खाऊचे वाटप…
कोल्हापूर – भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आमदार ऋतूराज पाटील यांच्याकडून कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील ५२ हजार शालेय विद्यार्थ्यांना तिरंगा बॅच व गोड खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना देशभक्ती व स्वातंत्र्य यांचे महत्व कळावे व स्वातंत्र्य दिनाचा आनंद द्विगणित करावा या हेतूने आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून हा उपक्रम राबविण्यात आला.
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील सर्व शाळांमध्ये कार्यकर्त्यांकडून स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांना तिरंगा बॅच, गोड खाऊ आणि शुभेच्छा कार्ड यांचे वाटप करण्यात आले. देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये स्वातंत्र्य व देशभक्तीचे मूल्य अधिक वृद्धिंगत करण्यासाठी यावेळी विद्यार्थ्यांना शुभेच्छा कार्डचे वाटप करण्यात आले.
अनेक शूरवीरांच्या बलिदानातून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. या सर्वांबद्दल आपण नेहमीच कृतज्ञ राहूया. विविधतेतून एकता जपणाऱ्या आपल्या भारत देशाचे तुम्ही भविष्य आहात. देशाची एकता आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया, असे आवाहन या शुभेच्छा कार्डद्वारे आमदार ऋतुराज पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.