80 लाखांचा हाेणार खर्च;साळाेखेनगर येथे धनंजय महाडीक यांच्याहस्ते विकासकामांचा शुभारंभ

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

काेल्हापूरः खासदार धनंजय महाडिक यांच्या विशेष प्रयत्नातून आणि माजी आमदार अमल महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे कोल्हापुरातील साळोखेनगर प्रभागात विविध विकास कामांसाठी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून करण्यात येणार्‍या विविध कामांचा शुभारंभ खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झाला. कोल्हापूर शहरासह उपनगरातील विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली.
कोल्हापूरातील उपनगरांमध्ये पायाभूत सुविधांची वानवा आहे. साळोखेनगर प्रभागात विविध विकासकामे करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी शासनाकडून निधी मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्याचबरोबर माजी आमदार अमल महाडिक यांनी त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याने साळोनगर प्रभागातील विविध विकासकामांसाठी ८० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यावेळी सोसायटीचे चेअरमन विलास काईंगडे, माजी नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, भाजप शक्तीकेंद्र प्रमुख अभय तेंडुलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ८० लाख रुपयांच्या निधीतून साळोखेनगर मध्ये अंतर्गत रस्ते, कॉंक्रिट गटर्स आणि सांस्कृतिक हॉलची उभारणी करण्यात येणार आहे. कोल्हापूर शहरासह उपनगरातील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली. यावेळी अमर चव्हाण, महेश पाटील, संदीप भोसले, राधिका कुलकर्णी, संजय पवार, राम पाटील, मनोज साळुंखे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.