|
तब्बल ५ लाख रूपयांची बक्षिसे असलेल्या झिम्मा-फुगडी स्पर्धा धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्था, भागीरथी युवती मंच, भागीरथी नागरी सहकारी पतसंस्था आणि भाजपच्यावतीने दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठया झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा १६ व्या वर्षी मंगळवार दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजी, महासैनिक दरबार हॉल सर्किट हाऊस शेजारी लाईन बाजार येथे झिम्मा – फुगडीसह महिलांच्या पारंपारिक खेळांच्या स्पर्धा रंगणार आहेत. या स्पर्धेसाठी तब्बल ५ लाख रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.अशी माहिती भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आम्ही प्रयत्नशील…अरुंधती महाडिक! काय करणार ते केले असे स्पष्ट ही बातमी देखिल जास्त वाचली गेली…
ही बातमी देखिल जास्त वाचली गेली…खासदार धनंजय महाडिक यांनी लावले कोल्हापुरात एक झाड,नेमके कारण पहा!
या स्पर्धेचा आनंद घरबसल्या लुटता यावा, यासाठी चॅनल बी च्यावतीने संपूर्ण स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेमध्ये सहभागी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध टिव्ही मालिकांमधील लोकप्रिय कलाकारांसह काही चित्रपट कलाकार या स्पर्धेत उपस्थिती लावणार आहेत.स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी ०२३१- २६२५५७७ किंवा ९०७५२१७७८८ या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन सौ. अरुंधती महाडिक यांनी केले. सौ वैष्णवी महाडिक,सौ मंजिरी महाडिक उपस्थित होते. |
पाच लाख रुपये मिळवा! महिलावर्गांसाठी संधी… १६ सप्टेंबरला वेळ राखून ठेवा,
पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.
















































































