WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पुरवणार सरकारला फिश फार्मिंगसाठी आधुनिक तंत्रज्ञान

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

विनायक जितकर

महाराष्ट्र मत्स्य विभाग अधिकाऱ्यांची रिसर्च सेंटरला भेट राज्याच्या मत्स्य विभागाचे अधिकारी मोहसीन शेख याचे स्वागत करताना डॉ. सतीश पावसकर, प्रा आरिफ शेख, प्रकाश भागाजे, प्रा. आर. एस. पवार आदी.

तळसंदे : शेतीपूरक व्यवसाय म्हणून ‘बायोफ्लॉग फिश फार्मिंग’ ची व्याप्ती वाढवण्याचे धोरण सरकारने अवलंबले आहे. कमी जागेत जास्तीत जास्त मत्स्योत्पादन घेता यावे यासाठी मत्स्य विभागाला आवश्यक असलेले आधुनिक तंत्रज्ञान डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरमार्फत पुरवले जाणार आहे. राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाचे टेक्निकल तज्ञ मोहसीन शेख व अन्य अधिकाऱ्यानी कॅम्पसला दिलेल्या भेटीत यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

शेतीला जोडधंदा म्हणून बायोफ्लॉग फिश फार्मिंगच्या मध्यमातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते. दुष्काळी पट्टा व क्षारपड जमिनीमध्येहि हि मत्स्य शेती करणे शक्य असल्याने बायोफ्लॉग फिश फार्मिंगवर राज्य सरकारच्या मत्स्य विभागाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, यासाठी योग्य ते तंत्रज्ञान सरकारकडे उपलब्ध नसल्याने हा व्यवसाय म्हणावा तसा फायदेशीर ठरत नाही.

या पार्श्वभूमीवर मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यानी डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस रिसर्च सेंटरला भेट दिली. कॅम्पस डायरेक्टर डॉ. सतीश पावसकर व विभाग प्रमुख प्राध्यापक आरिफ शेख यांनी या अधिकाऱ्याचे स्वागत करून सेंटरमध्ये सुरु असलेल्या संशोधन कार्याची माहिती दिली. शेतीपूरक व्यवसायामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची गरज असून हा व्यवसाय शेतकऱ्यांना फायदेशीर करून देण्यासाठी नवीन रिसर्च व डेव्हलपमेंट यासंबंधी यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

‘बायोफ्लॉग फिश फार्मिंग’ अधिकाधिक फायदेशीर होण्यासाठी आवश्यक असलेली ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी त्याचबरोबर रिसर्च अँड डेव्हलपमेंटची जोड देऊन ‘कॉस्ट इफेक्टिव इक्विपमेंट्स’ तयार करून देण्याची हमी यावेळी प्रा. शेख यांनी दिली. गरीब शेतकऱ्यालाही या तंत्रज्ञानाच्या जास्तीत जास्त उत्पादन घेता यावे, अंडी उबवणी व मत्स्य निर्मिती या दरम्यान होणारे नुकसान कमी करणे, त्यासाठी आवश्यक आधुनिक इंक्यूब्युटर तयार करणे, आयओटी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व प्रक्रिया नियंत्रित करणे यासाठी संशोधीत तंत्रज्ञान मत्स्य विभागाला उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे मत्स्य शेती हा यापुढील काळात शेतकऱ्यासाठी मोठे आर्थिक बळ देणारा पर्याय ठरणार आहे.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील, विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील,डी वाय पाटील ग्रुप चे कार्यकारी संचालक डॉ ए के गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली रिसर्च व डेव्हलपमेन्ट विभागचे कार्य सुरु असून त्याचा समाजासाठी जास्तीत जास्त फायदा व्हावा असे प्रयत्न सुरु असलेल्याचे डॉ पावसकर आणि प्रा. शेख यानी सांगितले. 

>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.