WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्यावतीने ‘डब्ल्यूसी अॅम्पिकॉन’ आंतरराष्ट्रीय परिषद

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

दिप प्रज्वलनाने ‘अॅम्पिकॉन’चा शुभारंभ

कोल्हापूर – डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लनरी रिसर्चच्या वैद्यकीय भौतिकशास्त्र विभागाच्यावतीने असोसिएशन ऑफ मेडिकल फिजिसिस्ट्स ऑफ इंडियाच्या सहकार्याने ‘डब्ल्यूसी अॅम्पिकॉन 2025’ ही आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न झाली. या परिषदेत देशभरातील २५० हून अधिक वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, अणुऊर्जा नियामक मंडळ, भाभा अणुसंशोधन केंद्र यांचे तज्ज्ञ आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.

हॉटेल सयाजी येथे २६ आणि २७ एप्रिल रोजी रिसर्च डायरेक्टर प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेचे उद्घाटन इंदिरा गांधी सेंटर फॉर अॅटोमिक रिसर्च, कल्पकमचे माजी संचालक आणि प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांच्या हस्ते झाले. डॉ. भोजे यांनी खाणकाम क्षेत्रातील कामगारांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका आणि अत्याधुनिक किरणोत्सर्ग उपचार पद्धती याबाबत मार्गदर्शन केले.

वैद्यकीय भौतिकशास्त्र क्षेत्रात नवीन संशोधन आणि तंत्रज्ञान याबाबत या परिषदेत मार्गदर्शन करण्यात आले. परिषदेमध्ये ड्युअल एनर्जी सिटी, एमार लीनॅक, इमेज सिंथेसिस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावर संशोधन सादर करण्यात आले. तसेच पीएसक्यूए, टोटल बॉडी ईरॅडीएशन (टीबीआय) आणि टोटल मॅरो अँड लिम्फोईड ईरॅडीएशन (टीएमएलआय) या विषयांवर पॅनेल चर्चासत्र आयोजित करण्यात आले. २७ एप्रिल रोजी कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे टीबीआय आणि टीएमएलआय विषयावर विशेष कार्यशाळा पार पडली. यावेळीसंयोजक श्री. थिरुनवुक्करासू मणि यांनी प्रत्यक्ष हाताळणीसह प्रशिक्षण दिले.

कोल्हापूर कॅन्सर सेंटर, श्री सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल, अॅस्टर आधार हॉस्पिटल, होरायझन हॉस्पिटल आणि शिव कॅन्सर इन्स्टिट्यूट हे परिषदेचे सहप्रायोजक होते. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.