विनायक जितकर
डी. वाय. पाटील अभियांत्रिकमध्ये ‘आयआयसीएचई’ स्टूडंट चाप्टरची स्थापना…
कसबा बावडा : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केमिकल इंजिनिअरिंग विभागात या क्षेत्रातील नामांकित शिखर संस्था इंडियन इंस्टीटयूट ऑफ केमिकल इंजिनिअर्सच्या (आयआयसीएचई) स्टुडंट चाप्टरची स्थापना करण्यात आली. सदर चॅप्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील विविध तंत्रज्ञानावर तसेच विविध विषयांवर आधारीत उपक्रम, स्पर्धा, कार्यशाळा, प्रकल्प, प्रबंध, अभ्यास भेटी, ज्ञानाची देवाणघेवाण आदीसाठी मदत होणार आहे. त्याचबरोबर विविध प्रकल्पांसाठी शिखर संस्थेकडून आर्थिक मदतही मिळेल.
यावेळी केमिकल विभागातर्फे “औद्योगिक जगतातील समस्यांचे निराकरण” या विषयावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी केमिकल इंजिनिअरिंगमधील एका महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या डिस्टिलेशन प्रोसेस (उर्ध्व पतन प्रक्रिया) या विषयावरील समस्या निराकरण करण्यासाठी देण्यात आली होती. सदर स्पर्धेसाठी विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवित कश्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांनी त्या समस्येचे निराकरण कसे केले जाऊ शकते याचे सादरीकरण केले.
सदर चाप्टर चे उद्घाटन आयआयसीएचईचे परिषद सदस्य डॉ. उत्कर्ष माहेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे यांच्यासह अधिष्ठाता, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. माहेश्वरी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनि केलेल्या सादरीकरणाचे मूल्यांकन केले. या चाप्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना होणाऱ्या विविध सुविधा, फायद्याचे विवेचन देखील सोदाहरण केले. संशोधन आणि विकास अधिष्ठाता डॉ. ए. एल. जाधव व विभागप्रमुख डॉ. के. टी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमासाठी समन्वयक म्हणून प्रा. समीर वानखेडे यांनी परिश्रम घेतले.
कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे यांनी सदर उपक्रमासाठी विभागाचे अभिनंदन केले तर संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष व विधानपरिषदेतील कॉंग्रेस गटनेते आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.