६७ लाखांचा ऐवज हस्तगत.. LCB ने असा घेतला ताब्यात

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

३२ घरफोड्यांचा थरार संपला! ‘एलसीबी’च्या धडाकेबाज कारवाईत ६७ लाखांचा ऐवज हस्तगत; ‘चोरटे बहाद्दर ’चा कोल्हापूरमध्ये पडला पडदा

कोल्हापूर – शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून घरफोड्यांनी थैमान घातलं होतं. नागरिकांच्या जीवाला आणि मालमत्तेला धोका निर्माण करणाऱ्या या घरफोड्यांच्या मागचं ‘चोरटे बहाद्दर ’ अखेर ‘एलसीबी’च्या जाळ्यात अडकले! स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या धडाकेबाज पथकाने ३ अट्टल घरफोड्यांना बेड्या ठोकत तब्बल ३२ गुन्ह्यांचा पर्दाफाश केला. त्यांच्या मुसक्याबांधीतून तब्बल ६७ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 

तपासाअंती यामध्ये तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांची नावे सलीम महंमद शेख (वय ३७, रा. गंधारपाले, महाड, रायगड),जावेद महंमद शेख (वय ३०, रा. गंधारपाले, महाड, रायगड),तौफिक महंमद शेख (वय ३०, रा. रुमाले मळा, आर.के. नगर, कोल्हापूर, मूळ रा. संजय गांधी नगर, चिक्कोडी, बेळगाव) अशी आहेत.

या तिघांनी मिळून कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांमध्ये घरफोडी करत मिळवलेले सोनं, चांदी यातील काही दागिने कोल्हापूर शहरात आणि सीमाभागातील बेळगाव, चिक्कोडी भागातील सराफांकडे विकल्याचे उघड झाले आहे. त्या दागिन्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे स्वतंत्र पथक कार्यरत आहे. यामध्ये आता आणखी सराफ कोण कोण आहेत. याचा शोध घेण्यात येत आहे.
या तिन्ही आरोपीकडून असे गुन्हे उघडकीस आले आहेत.
करवीर : १८
जुना राजवाडा : ५
शाहूपुरी : २
राजारामपुरी : २
लक्ष्मीपूरी : २
गांधीनगर : २
कागल : १
इचलकरंजी (मोटरसायकल चोरी) : १
एकूण गुन्हे : ३३ गुन्ह्याचा यात समावेश आहव.

या चोऱ्यांची मालकी असलेले दागिने कोठून आणले, कुठे विकले आणि आणखी कोणत्या सराफांचा यात सहभाग आहे, याचा तपासही सुरू आहे. या चोरट्यांकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

या कारवाईची कमान होती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी आणि पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली. तपासाची दिशा, वेग आणि अचूकता पाहता, दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या टीमचं खुलेपणाने कौतुक केलं आहे.

***पोलिसांची कमाल टीम आणि कौतुकाची थाप
पो.नि. रविंद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखालील एलसीबी टीमने दिवस-रात्र एक करत सायबर ट्रेसिंग, सीसीटीव्ही विश्लेषण आणि स्थानिक खबरदारीच्या आधारे चोरांचा माग काढला. या कामगिरीचं विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी आणि पोलीस अधीक्षक पंडित यांनी मुक्तकंठाने कौतुक केलं आहे. “तपासातलं कौशल्य, चिकाटी आणि टीमवर्कचं उत्तम उदाहरण या कारवाईत पाहायला मिळालं,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

**हे तिघे एकाच टोळीचे. चोरीपूर्वी ‘रेकी’ करणे, बंद घरांची पाळत ठेवणे, आणि अत्यंत शिताफीने रात्रीच्या अंधारात घरफोडी करणे, ही त्यांची ठरलेली पद्धत. चोरीतील दागिने शहर आणि सीमाभागातील सराफांकडे विकले जात असल्याचं तपासात उघड झालं आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांमध्ये घरफोडी करत मिळवलेले सोनं, चांदी यातील काही दागिने कोल्हापूर शहरात आणि सीमाभागातील बेळगाव, चिक्कोडी भागातील सराफांकडे विकल्याचे उघड झाले आहे. त्या दागिन्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे स्वतंत्र पथक कार्यरत आहे. सायबर युनिटचे आतिश म्हेत्रे यांचं विशेष तांत्रिक योगदानही या तपासात महत्वाची भूमिका बजावून गेली.

**ही कारवाई :
पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पो.उ.नि. शेष मोरे, पोलीस अंमलदार सागर माने, संजय कुंभार, महेश खोत, लखनसिंह पाटील, महेश पाटील, विजय इंगळे, संदीप बेंद्रे, शुभम संकपाळ, विशाल चौगुले, प्रविण पाटील, अमित सर्जे, अरविंद पाटील, सागर चौगले, अमोल कोळेकर, सुरेश पाटील, कृष्णात पिंगळे, सुशिल पाटील, राजेंद्र वरंडेकर, राजेश राठोड, रोहित मर्दाने, यशवंत कुंभार, नामदेव यादव, सायली कुलकर्णी, प्रज्ञा पाटील आणि सायबर पोलीस ठाण्याचे पो.उ.नि. आतिश म्हेत्रे व त्यांच्या पथकाचे विशेष योगदान देत ही कारवाई फत्ते केली.

या पथकाला अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके (शहर), सुजितकुमार क्षीरसागर (करवीर) यांचेही बहुमूल्य सहकार्य लाभले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.