चिपळूण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; २४ तासांत भीषण हत्याकांडाचा उलगडा, विविध संस्थांकडून कौतुकाचा वर्षाव

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

चिपळूण- (रंजित आवले) : चिपळूण तालुक्यातील रामपूर येथील आवटेवाडी परिसरात आंब्याच्या बागेत जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या मानवी अवशेषांच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला होता. या गंभीर प्रकरणाचा वेगाने आणि अत्यंत शिताफीने तपास करत चिपळूण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत मुंबईतील भीषण हत्याकांडाचा पर्दाफाश करत मुख्य संशयित आरोपी विशाल विजय खोडदेकर आणि त्याची मैत्रीण जन्नतुनिसा झिन्नत खान यांना अटक केली. या धडाकेबाज कामगिरीमुळे पोलीस प्रशासनाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल जिजाऊ ब्रिगेड, कोकण कन्या सोशल वेल्फेअर फाऊंडेशन आणि रिजनल टिचर्स ऑर्गनायझेशन दापोली-रत्नागिरी पर्यावरण या संस्थांच्या वतीने चिपळूण पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी या संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती देताना तपासादरम्यान आलेल्या अडचणी आणि त्यावर मात करण्यासाठी अवलंबलेल्या पद्धतींचा उलगडा केला. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांनी घटनास्थळी पथकासह तातडीने धाव घेत कशाप्रकारे पुरावे गोळा करण्यात आले, याची माहिती उपस्थितांना दिली.

जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली आणि ३१ मार्च रोजी पहाटे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. अल्पावधीत गुन्ह्याचा उलगडा करून आरोपींना अटक करण्याची ही कामगिरी पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण ठरली आहे.

हा लेख देखिल खूप वाचला गेला… लिंक क्लिक करा...“बदलती जीवनशैली आणि वाढणारे घटस्फोटाचे प्रमाण : विवाहसंस्थेसमोरील नवे आव्हान!”

या वेळी जिजाऊ ब्रिगेड जिल्हा कायदेशीर सल्लागार तसेच कोकण कन्या सोशल वेल्फेअर फाऊंडेशनच्या अध्यक्षा ऍड. वृषाली सावंत, जिजाऊ ब्रिगेड जिल्हा सचिव पूर्वाताई तांदळे, जिजाऊ ब्रिगेड शहर अध्यक्ष व रिजनल टिचर्स ऑर्गनायझेशनच्या जिल्हा अध्यक्षा वर्षा खटके पाटील, समाजसेविका पूनम ताई भोजने, तृप्ती ताई कदम, ऍड. प्रियांका वाटेकर, जिजाऊ ब्रिगेड सदस्य दिलबर शराफत खान, नाटूस्कर ताई तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.सर्व उपस्थितांनी चिपळूण पोलीस प्रशासनाच्या तत्परता, धाडस आणि कर्तव्यनिष्ठेचे कौतुक करत भविष्यातही अशाच पद्धतीने गुन्हेगारीवर लगाम घालण्याची अपेक्षा व्यक्त केली.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.