मिलिंद यादव चिल्लर पार्टी विध्यार्थी चित्रपट चळवळ गेल्या दहा वर्षांपासून चिल्लर पार्टी सिनेमाच्या माध्यमातून लहान मुलांच्यात काम करत आहे.
महानगर पालिकेच्या शाळेतील मुलांसाठी, गेली सहा वर्षे बाल चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले. गेल्या दोन वर्षांपासून दुर्गम भागातील, वाड्यावस्त्यांवरील मुलांना सिनेमा दाखवत हिंडत असताना, लक्षात आले की या मुलांना शहराची ओळखच नाही. मग थिएटर, संग्रहालय असं एकूणच प्रगत काहीच ओळखीच नाही. मग किमान या गोष्टींची ओळख व्हावी म्हणून मागील वर्षी दोनशे मुलांना कोल्हापुरात आणले. थिएटरमध्ये सिनेमा दाखवला. न्यू पॅलेसची भेट घडवली. मस्तपैकी एक जेवण दिले. आईस्क्रीमची चव चाखली मुलांनी. या वेळच्या दोन प्रतिक्रिया आम्हाला अंतर्मुख करून गेल्या.
न्यू पॅलेस बघितल्यावर एक मुलगा आपल्या सहकाऱ्याला सांगत होता,” आगागा… राजा एवढ्या मोठ्या घरात ऱ्हातोय ?” एक शिक्षक,” सर, या मुलांनी असा कोनातला आईस्क्रीम पहिल्यांदाच खाल्लाय. वाडीव सायकलवरून घंटी वाजवत कांडीचा गारेगार खात्यात, ते बी कधीतरी.
मित्रांनो, पुढील महिन्यात चिल्लर पार्टीचा ११ वा वर्धापन दिन आहे. या दिवशी दुसऱ्या भागातील ३०० मुलं आणायचे ठरवले आहे. यांचा जेवणाचा भार माझ्या एका मित्राने उचलला आहे. त्यांच्या येण्या-जाण्यासाठी २५,००० रु खर्च येणार आहे. आपण मदतीचा हात दिलात तर या मुलांना शहराची ओळख करून द्यायला सोपे जाईल.