तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
अन.. छत्रपती शिवरायांचा पुतळा पुन्हा विद्युत रोषणाईने उजाळला
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पेठ येथील अर्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या भोवती असणारे लाईट बंद पडल्याने गेले काही दिवस पुतळा अंधारामध्ये होता. याबाबत स्थानिक नागरिकांनी याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांना दिली.
आमदार राजेश क्षीरसागर यांनी याची तात्काळ दखल घेत पुतळ्याभोवती असलेली विद्युत रोषणाई तात्काळ बदलायच्या सूचना कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या विद्युत विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील विद्युत रोषणाईच्या कामाची दुरुस्ती करून नवीन दिवे बसविण्यात आले. यामुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा व परिसर पुन्हा एकदा विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या या कार्यतत्परतेबाबत नागरिकांमधून समाधान होत आहे.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.