GOOD NEWS:अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ पदावर विविध निवडी

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

*अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली नुतन राष्ट्रीय अध्यक्ष पदी भास्करराव टोपे यांची सर्वांनूमते निवड करण्यात आली.यावेळी महासंघाचे माजी अध्यक्ष डॉ.नारायणराव पाथरकर, तसेच महासचिव सुरेंद्र सिंग टोनी,कार्याध्यक्ष ज्वाला प्रसाद नामदेव,कोषाध्यक्ष राजपाल रोहिला,राष्ट्रीय संयुक्त सचिव महादेव खटावकर, गोवा राज्याचे अध्यक्ष रमेश साहेब भिंगे, महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष पांडुरंग जी जावळे , महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धीप्रमुख संतोष मुळे,पुणे जिल्हा उपाध्यक्ष,प्रदीप कळसकर, योगेश मुळे,नूतन अध्यक्ष विदर्भ शिंपी समाजाचे अध्यक्ष ,गो सी टोम्पे महाविद्यालय सार्व ट्रस्ट चांदूरबाजार प्रमुख आणि विविध सामाजिक संस्थाचे पदाधिकारी,अध्यक्ष आहेत. या निवडीनंतर सर्वानी स्वागत व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. निवडीनंतर नामदेव शिंपी समाजाच्याया उन्नतीसाठी प्रयत्न करू तसेच, समाजबांधव यांच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीसाठी पुढाकार घेऊन एकजुटीने कार्यरत राहू अशी ग्वाही देत, राजकीय नेत्यांकडून समाजासाठी विविध मागण्याद्वारे  समाजाला पुढे नेऊया असा निर्णय निवडीनंतर घेण्यात आला.

तसेच प्रशासन स्तरावर येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ज्या त्या विभागातील पदाधिकारी नी समाजबांधव यांना सहकार्य करावे असे ठरले. यावेळी समाजकारण करताना अन्य समाजबांधवना सोबत घेऊन सामाजिक उपक्रम राबविले जातील, यावर देखील नवनिर्वाचित निवडीनंतर ठरले. या नवनिर्वाचित पदाधिकारी वर्गाचे असंख्य समाजबांधवांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.