कोळसा घोटाळा प्रकरणी विजय दर्डा यांना मोठा दणका…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विजय दर्डा आणि त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांची शिक्षा…

दिल्ली – कोळसा घोटाळा प्रकरणी दिल्लीच्या विशेष न्यायालयाने काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा यांना मोठा दणका दिला आहे. या प्रकरणी न्यायालयाने आज विजय दर्डा आणि त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे . तसेच यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांनाही छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपातील अनियमिततेच्या प्रकरणात चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

याबाबत अधिक माहिती अशी कि, याच प्रकरणात न्यायालयाने माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता, दोन ज्येष्ठ लोकसेवक केएस क्रोफा आणि केसी सामरिया यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने विजय दर्डा आणि इतरांना कलम 120 बी, 420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरवले आहे. दरम्यान विजय दर्डा काँग्रेसकडून राज्यसभेवर खासदार होते. गेल्या पाच दशकांपासून दर्डा कुटुंब राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात सक्रिय आहे. त्यामुळे आजच्या निकालानं दर्डा कुटुंबियांसमोरची आव्हानं नक्कीच वाढली आहेत.

दरम्यान छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांच्यासह सर्वाना दोषी ठरवण्यात आलं होत. त्यानंतर आज दिल्लीतील विशेष कोर्टाने हा निकाल दिला आहे.

आजच नवी वाट शाेधा.. सेमिनारला जाल तर समजेल.. पैशाचा मार्ग
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.