WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

विद्यापीठात सर्वांगीण विद्यार्थी विकास इमारतीचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते भूमीपूजन

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

सर्वांगीण विद्यार्थी विकास आणि संगणक सुविधा केंद्र उभारण्यात येणार

कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठात आज राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सर्वांगीण विद्यार्थी विकास आणि संगणक सुविधा केंद्राच्या इमारतीचे भूमीपूजन करण्यात आले. शिवाजी विद्यापीठ मुद्रणालय व सबस्टेशन क्र. १ जवळील परिसरात शिवाजी विद्यापीठाने सर्वांगीण विद्यार्थी विकास आणि संगणक सुविधा केंद्र उभारण्याचे ठरविले आहे. प्रस्तावित इमारतीमध्ये केंद्रीय रोजगार कक्ष, कौशल्य विकास कक्ष, संशोधन व विकास कक्ष, संस्थात्मक नवोन्मेष मंडळ, सेमिनार कक्ष, परिषद सभागृह, एसयूके संशोधन व विकास फौंडेशन, आंतरराष्ट्रीय व्यवहार कक्ष, नवोन्मेष क्लिनिक, प्रयोगशाळा प्रशासक इत्यादी कक्षांचा समावेश असणार आहे.

या इमारतीचे मंत्री आबिटकर यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे इमारतीच्या कोनशिलेचे अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी मंत्री महोदयांना प्रकल्पाच्या आराखड्याविषयी माहिती दिली. त्याचप्रमाणे प्र-कलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कलसचिव डॉ. विलास शिंदे आणि इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांनी या इमारतीमधील विविध कक्षांची वैशिष्ट्ये आणि महत्त्व याविषयी माहिती दिली. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, आजीवन अध्ययन केंद्र संचालक डॉ. रामचंद्र पवार, उपकुलसचिव रणजीत यादव, अमित कांबळे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी, विविध अधिकार मंडळांचे सदस्य, बांधकाम समिती सदस्य, अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वांगीण विद्यार्थी विकास आणि संगणक सुविधा केंद्र इमारतीच्या कामासाठी केंद्र सरकारच्या पीएम-उषा या योजनेअंतर्गत निधी मंजूर झाला असून या इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ठेव अंशदान योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे. इमारतीसाठी सुमारे साडेपाच कोटी रुपये इतका खर्च प्रस्तावित आहे. सध्या तळमजला अधिक पहिला मजला असे बांधकाम प्रस्तावित असून त्यांचे क्षेत्रफळ अनुक्रमे ९४९.४९ चौरस मीटर आणि ९१०.६१ चौरस मीटर असे एकूण १८६०.१० चौरस मीटर इतके असेल.

विद्यापीठात सृजनात्मक, नवोन्मेषी कार्य व्हावे: मंत्री प्रकाश आबिटकर
भूमीपूजन समारंभानंतर व्यवस्थापन परिषद सभागृहात कुलगुरू डॉ. शिर्के यांनी मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासमोर विद्यापीठाच्या वाटचालीविषयी सादरीकरण केले. यामुळे मंत्री आबिटकर प्रभावित झाले. ते म्हणाले, मी स्वतः शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी असल्यामुळे विद्यापीठाने केलेल्या वाटचालीचा मला अभिमान आहे. आपण सर्वांनी मिळून या विद्यापीठाचे भवितव्य अधिक उज्ज्वल होण्यासाठी प्रयत्न करू या. त्यासाठी शासन स्तरावरही सर्वोतोपरी सहकार्य करण्याची भूमिका राहील. विद्यापीठाने सृजनात्मक आणि नवोन्मेषी स्वरुपाचे काम येथून पुढील काळात अधिक गतीने करावे, अशी अपेक्षा मंत्री आबिटकर यांनी व्यक्त केली. यावेळी विद्यापीठाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.