विनायक जितकर
भुदरगड तालुका जेष्ठ नागरीक सेवा संघामार्फत पुरस्कार जाहीर… सोमवार 14 रोजी होणार वितरण…
गारगोटी प्रतिनिधी – भुदरगड तालुक्यातील पुरोगामी व कामगार चळवळीतील जेष्ठ मार्गदर्शक आणि लढाऊ नेतृत्व गारगोटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भाई आनंदराव आबिटकर यांना भुदरगड तालुका जेष्ठ नागरीक सेवा संघाचा सन 2024-25 सालातील भुदरगड भुषण पुरस्कार व माजी सभापती किर्तीताई देसाई यांना आदर्श माता पुरस्कार जाहीर झाला असून सदर पुरस्काराचे वितरण सोमवार दि. 14 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रसंत प.पु.अदृश्य काडसिध्देश्वर स्वामीजी यांच्या शुभहस्ते तर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री इंजूबाई सांस्कृतिक हॉल, गारगोटी येथे होणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष एम. आर. टिपुगडे व सचिव बी. एस. माने यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, भाई आनंदराव आबिटकर यांनी सामाजिक व कामगार चळवळीत काम करत असताना सातत्याने सामान्य लोकांच्यासाठी रस्त्यावरच्या चळवळी करून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. गारगोटी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून देखील अतिशय उत्कृष्ठ काम केलेले आहे. यासह बिद्री साखर कारखान्याच्या कामगार संघटनेचे नेतृत्व करून न्यायाची भूमिका सातत्याने घेतली आहे.
भुदरगड पंचायत समितीच्या माजी सभापती किर्तीताई देसाई यांनी आपल्या सभापती पदाच्या काळात नामदार प्रकाश आबिटकर यांच्यासह प्रमुख नेतेमंडळींच्या नेवृत्वामध्ये काम करत असतना अनेक विकासाची काम यशस्वीपणे पुर्ण केलेली आहेत. प्रतिकृल परिस्थीतीत त्यांनी आपल्या मुलांना उच्चविद्याभूषित केले असून त्यांना आदर्शमाता पुरस्कार देण्यात येणार असून तालुक्यातील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.