भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग हा ब्रिटिशांच्या काळातला विभाग आहे. या विभागामुळे संपूर्ण देशात अनेक ठिकाणी अडचणी निर्माण झालेल्या आहेत. महाराष्ट्रात ज्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या किल्ले शिवनेरीवर आजपर्यंत कायमस्वरुपी भगवा ध्वज फडकलेला नाही. जे सरकार घटनेतील कलम ३७० हटवू शकते, ते सरकार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या नियमांमध्ये सुधारणा करुन छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करु शकत नाही? असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला. संसदेचे सध्या अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु असून त्यात आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या अभिनंदनाच्या प्रस्तावर अमोल कोल्हे यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी राज्यातील काही महत्त्वाच्या प्रश्नांना हात घातला. या भाषणात त्यांनी राज्यातील काही महत्त्वाच्या प्रश्नांना हात घातला. तसेच देशात वाढलेली महागाई, बेरोजगारी यावर आपल्या अमोघ वक्तृत्वाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले.
सहकारी साखर कारखाने; पर्यायाने शेतकर्‍यांना लाभ होणार-खासदार धनंजय महाडिक