काळजाचा ठेका चुकला… पूल कोसळला नि आमदार निकम सहकाऱ्यांसह धावले; पुढे!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

बहादूरशेख येथील उड्डाणपूलाला क्रॅक गेल्याची पहाणी करताना दुर्घटना टळली…

चिपळूण –  पुण्य काय असते आणि आशिर्वाद पाठीशी कसे असतात, हे आज आ. शेखर निकम यांच्यावर कोसळलेल्या घटनेतून सर्वाना पहावयास मिळाले. काही सेकंदात आपल्या, अवतीभोवतीच्या  सहकार्याना कोसळत असलेल्या पुलाखालून बाहेर काढत स्वतः डांबराच्या पिंपावरून उडी मारली.मात्र आधी त्यांनी सहकाऱ्यांसह स्वतःचा जीव वाचवला. आ. शेखर निकम यांच्यासमोर आलेला काळ केवळ त्यांच्या पुण्याईने आणि जनतेच्या आशीर्वादाने दैव्य बळकट असल्यानेच बालबाल बचावले.  ही घटना आमदार शेखर निकम पहाणी करताना घटना घडली. बहादूरशेख येथील उड्डाणपूलाला क्रॅक गेल्याने त्याची पहाणी करण्यासाठी आ. शेखर निकम राष्ट्रवादी शहराध्यक्ष मिलिंद कापडी, जयन्द्रथ खताते, सचिन साडविलकर, समाजीक कार्यकर्ते प्रकाश पवार, संबंधित यंत्रणेचे अधिकारी सोमवारी दुपारी पहाणी करीत होते.

यावेळी, सारेजण पाहणी करण्यात मग्न होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. उड्डाणपुलाच्या खाली पहाणी केल्यानंतर आ . शेखर निकम यांनी हायवेच्या वरिष्ठांना या बाबत माहिती देऊन आता पुढे काय करावे लागेल, याच्या सूचना देऊन या संदर्भात तात्काळ दखल घेऊन येथील धोका टाळावा .अन्यथा मोठा अनर्थ घडेल, याची कल्पना दिली आणि काही सेकंदात पुढील घटना घडली. एक प्रकारचा गडगडाट झाला घुमू लागला. पहाणी करीत असताना ज्या ठिकाणी क्रेन कोसळी आहे त्या ठिकाणी आ. निकमासह सारे चर्चा करीत असताना क्रॅक गेल्या ठिकाणी गडगडाट आवाज येऊ लागला. त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूर ही हवेत उडू लागला . खाली असणाऱ्याच्या लक्षात ही बाब येत नव्हती, मात्र बाहेर असणाऱ्या जाणवले.

काळजाचा ठोका चुकला.गडगडाट होत होता आणि हवेत धूराचे लोट उडत होते. खाली आमदार आणि काही लोक आहेत .आता काय होणार याच काळजीत सारे होते, त्यातच एक महत्वाचा  कॉल आ. निकमाना आला, मात्र तो घेण्यापूर्वीच धडाधड पूल कोसळू लागला होता. समोरचे दृश्य बघून अनेकांचा काळजाचा ठोकाच चुकला. आ. शेखर निकमाना आता धोक्याची कल्पना आली काही सेकंद हातात होती. वरून वाळू कोसळू लागली अन साऱ्यांचा थरकाप उडाला होता.. मरणाच्या दारात असलेल्या साऱ्यांना बघून आ. निकमानी तत्काळ साऱ्यांना बाहेर काढले, व आपण ही यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. व त्यात यशस्वी झाले.

पिंपावरून उडी मारली व आ. शेखर निकमानी साऱ्यांना बाहेर काढले कोणी नाही. याची खातरजमा करून स्वतः पळत येत समोर लावलेल्या पिंपावरून उडी मारली ते डांबर सांडलेल्या ठिकाणी पडले. वेगवेगळ्या ठिकाणी काहीजण पळत होते.यात लोखंडी साहित्य आणि अन्य काही वस्तू मिलिंद कापडी, साडविलकर यांच्या अंगावर कोसळल्या. पापणी लवते न लवते तोच  हा कोसळला.

आ शेखर निकम हे उत्कृष्ट खेळाडू आहेत मरण डोक्यावर असतानाही चाणाक्षपणे त्यांनी उडी मारत रस्त्यावर कोसळले आणि काही अंतरावर क्रेनसह ब्रिज जमीन दोस्त झाला .काहीक्षण आ.निकम हे पाहतच राहिले. केवळ दैव् बल्लावत्तर होते जनतेचा आशीर्वाद होता तसेच आ. निकम आणि त्याच्या कुटूंबाची पुण्याई आज उभी ठाकली. यात कार्यकर्त्यांवर असलेले जीवपाड प्रेम देखील पाहायला मिळालं. उडी मारून आ. निकम पडलेल्या डांबरात पडले . बाजूलाच सहकारी सचिन साडविलकर पडला होता. लगोलग त्याला धरून उठवले तो उठलाही मात्र पुन्हा पाय घसरून आ. निकम रस्त्यावर पडले कार्यकर्त्याला जपणारा आमदार कसा असतो, हे आज आ. निकमाच्या या कृतीतून उपस्थिताना पहावयास मिळाले.

आ. शेखर निकम यांच्या उजव्या पायाला अन पायाच्या ढोपर याना मार बसला आहे तर मिलिंद कापडी आणि सचिन साडविलकर याना अनेक ठिकाणी मोठया दुखापती झाल्या आहेत तर सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांना ही दुखापत झाली. कापडी आणि साडविलकर याना रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेसाठी सातत्याने झटणारे आ . निकम यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता .कोरोना, चिपळूणचा महापूर आशा घटनांमध्ये आ. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेला धोक्यातून बाहेर काढत होते. मात्र आज ते स्वतःच संकटात अडकले होते मात्र, सुदैवाने बालबाल आज या धोक्यातून बाहेर पडले. आ. शेखर निकम आणि कार्यकर्ते अधिकारी ज्या ठिकाणी उभे होते त्याच ठिकाणी क्रेन आणि गार्डर कोसळले क्रेन आहे त्या स्थितीत खाली आली मात्र जर क्रेन आडवी पडली असती तर ती रस्त्यावर आली असती आणि मोठा अनर्थ घडला असता.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.