शासन कारवाई करणार का आमदार सतेज पाटील यांचा विधान परिषदेत प्रश्न उपस्थित…
नागपूर – अन्नसुरक्षा योजनेमध्ये अंत्योदयचं कार्ड नसलेल्या दिव्यांग आणि अनाथांचा प्रश्न काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला. यावर उत्तर देताना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिव्यांग आणि अनाथांचा समावेश करण्याबाबत पुन्हा एकदा अशी मोहीम राबविण्यात येईल असं आश्वासन दिलं.
अन्नसुरक्षा योजनेमध्ये अंत्योदयचं कार्ड नसलेल्या दिव्यांग आणि अनाथांना यापूर्वी एका मोहिमेच्या माध्यमातून प्राधान्यक्रम दाखवून समाविष्ट करून घेण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा अशी मोहीम राबवून दिव्यांग आणि अनाथांचा समावेश करण्याबाबत शासन कारवाई करणार का असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. यावर उत्तर देताना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा अशी मोहीम राबविण्यात येईल असं आश्वासन दिलं.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.













































































