राजश्री शाहू परिवर्तन विकास आघाडीचा उद्या प्रचार शुभारंभ…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विनायक जितकर

गणेश मंदीर तुरंबे येथे आघाडीच्या प्रमुख नेते मंडळींच्या उपस्थितीत प्रचार शुभारंभ…

गारगोटी प्रतिनिधी – श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लि. बिद्री ता. कागल कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, जतना दल व मित्र पक्षाच्या राजश्री शाहू परिवर्तन विकास आघाडीचा प्रचार शुभारंभ उद्या मंगळवार 21 रोजी सकाळी 10 वाजता गणेश मंदीर पटांगण तुरंबे, ता. राधानगरी येथे होणार आहे.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

प्रचार शुभारंभाकरीता आघाडीचे नेते खासदार संजयदादा मंडलिक, खासदार धनंजय महाडीक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार अमल महाडीक, भाजपा नेते राजे समरजितसिंह घाटगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जनता दलाचे प्रमुख व बिद्री कारखान्याचे व्हा. चेअरमन विठ्ठलराव खोराटे, जेष्ठनेते मारुतीराव जाधव गुरूजी या प्रमुख नेते मंडळींच्या उपस्थितीत प्रचार शुभारंभ संपन्न होणार आहे.

यावेळी बिद्रीचे विद्यमान संचालक बाबासाहेब पाटील, गोकुळ संचालक अभिजित तायशेटे, नंदकुमार ढेंगे, माजी उपसभाती अरुण जाधव, कल्याणराव निकम, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेखान जमादार, बिद्रीचे माजी संचालक के. जी. नांदेकर, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघाचे प्रशासकीय अध्यक्ष सुर्याजीराव देसाई, रणजित पाटील-मुरगूडकर, बाजार समिती संचालक संदीप वरंडेकर यांच्यासह सर्वच पक्षांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, जतना दल व मित्र पक्ष एकत्र आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून या प्रचार शुभारंभ सभेच्या निमित्ताने कार्यकर्ते चार्ज होणार आहेत. बिद्री कारखान्याच्या निवडणूकीमध्ये परिवर्तनाची लाट असून ही सभा उच्चांकी होणार आहे. यामुळे सभेला सर्वांनी कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राजश्री शाहू परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.