देशभरातील NCC कॅडेट्स अनुभवणार पन्हाळा ते विशाळगड ट्रेकींगचा थरार–शिवाजी ट्रेलट्रेक 2023 मोहिमेला प्रारंभ

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

* एक हजार पेक्षा अधिक स्ट़्डटंस सहभागी
प्रथमच महिला टीमचाही समावेश

देशभरातील सुमारे १ हजार पेक्षा अधिक अखिल भारतीय NCC कॅडेट्स अनुभवणार थरार, शिवाजी महाराजांची पन्हाळा ते विशाळगड मोहिम. शिवाजी महाराज यांचा गनिमी कावा, बाजीप्रभू देशपांडे यांची युद्धनिती आणि शिवा काशिद यांच्यासह अनेक मावळ्यांनी दिलेले बलिदान. पावनखिंडीतील ती घटना आणि पन्हाळा ते विशाळगडावरील त्याकाळातील काही थरारक, अंगावर शहारे आणणारे तसेच नव्या पिढीला मार्गदर्शक ठरणारा अभ्यास. निमित्त आहे. कोल्हापूर येथे रविवारपासून सुरु झालेल्या अखिल भारतीय NCC कॅडेट्ससाठी शिवाजी ट्रेलट्रेक 2023 मोहिमेचा.

​

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

अखिल भारतीय NCC कॅडेट्ससाठी शिवाजी ट्रेलट्रेक 2023 ला रविवारी सुरुवात झाली. चार दिवसीय शिवाजी ट्रेलट्रेक मोहिमेचा शुभारंभ ब्रिगेडीयर अभिजीत वाळंबे यांच्या हस्ते हिरवा झेंडा (फ्लँग) दाखवून करण्यात आला. या मोहिमेत देशभरातून सुमारे १ हजार पेक्षा अधिक NCC ग्रुप या शिवाजी ट्रेलट्रेक चा अनुभव व शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांनी यशस्वी केलेल्या मोहिमेचा अनुभव घेण्याबरोबरच आजच्या रणनितीसाठी अभ्यास देखिल करणार आहेत. आज पहिल्या दिवशीच्या शिवाजी ट्रेलट्रेक मोहिमेत दिल्ली, गुजरात, कर्नाटकचे NCC कॅडेट्स सहभागी झाले आहेत. मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, गोवा, तामिळनाडूसह संपूर्ण देशभरातील NCC कॅडेट्सस या पाचदिवसीय मोहिमेचा आनंद, थरार लुटणार आहेत. प्रत्येक दिवशी २६४ NCC कॅडेट्सस एक तुकडी रवाना होणार आहे. शिवाजी ट्रेलट्रेक मोहिमेचे आयोजन NCC ग्रुप कोल्हापूर यांनी केलेले आहे. शुभारंभ प्रसंगी कर्नल सुहास काळे, कँम्प कमांडर कर्नल सदन मिश्रा, टे्निंग आँफिसर कर्नल समीर मोहिते, सुभेदार मेजर सुरेंद्र भोसले, ट्रेनिंग जेसीओ प्रशांत जमनिक, राजाराम आढाव उपस्थित होते. या सर्वांचे मार्गदर्शन २६४ NCC कॅडेट्सस लाभणार आहे.

दरम्यान, शुभारंभ प्रसंगी फ्लग दाखविण्यापूर्वी ब्रिगेडीयर अभिजीत वाळंबे यांनी स्टुडंन्टसला मार्दर्शन केले. पन्हाळा ते विशाळगड ही तुमच्या कारकिर्दीतील एक उल्लेखनीय मोहीम राहील, थेट युद्धभूमी तुम्ही अनुभवणार आहात. स्वराज्य स्थापन केलेल्या श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक मार्गाचा शोध जाणून घेण्याबरोबरच, त्या काळातील मावळे, त्यांचे राहणीमान, शरीरयष्टी, धाडसी वृत्ती, युद्धकला, स्वराज्य प्रेम, बाजीप्रभू देशपांडे यांचे धाडस, कर्तबगारी, शिवा काशिद यांचे शिवाजी महाराज यांच्यावरील प्रेम, स्वराज्यासाठी बलिदान देण्याची धमक यासारख्या प्रसंगाचा अभ्यास, प्रेरणा तुम्हाला या मोहिमेतून मिळेल. जीवावर उदार होऊन लढणारे लढवय्ये, अपुरे मनष्यबळ व अपुरी यंत्रसामुग्री असतानाही शिवाजी महाराज व त्यांचे काही मावळे यांनी आदिलशाहच्या हजारो सैनिकांना पावनखिंडीत कसे रोखून धरले उंच डोंगरदऱ्यातून, जीवघेण्या वाटेवरून अवघ्या २४ तासात विशाळगडावर कसे पोहोचले असतील, हीच शिकवण देण्याचा एक प्रयत्न या शिवाजी ट्रेलट्रेक ची मोहिमेअंतर्गत आहे. त्या काळात शिवाजी महाराज व मावळेंनी २४ तासात ही मोहीम पार पाडली. घनदाट जंगल, डोंगरदऱ्यातील खडतर वाट त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. मात्र हीच वाट तुम्ही चार ते पाच दिवसात पूर्ण करणार आहात..त्यामुळे शिस्तबद्ध, स्वतःची काळजी घेत, एक आदर्शदायी, अभ्सासूवृत्तीने, एक मार्गदर्शन ठरेल अशी मोहिम पार पाडा, असे आवाहन यावेळी ब्रिगेडीयर अभिजीत वाळंबे यांनी केले.

 

कर्नल सुहास काळे म्हणाले की, ही मोहिम पार पाडताना सह्याद्रीच्या पर्वतरांगा, विविध प्रकारची जैवविविधता, वेगवेगळे भूप्रदेश, पाहता येतील.NCC च्या प्रवासातील एक ऐतिहासिक क्षण आणि त्याचे साक्षीदार ठराल. यावेळेचे खास आकर्षण म्हणजे या मोहिमेत सिनियरविंग (SW) गर्ल कॅडेट्सच्या प्रथमच समावेश केला आहे. महिला कॅडेट्स या आव्हानात्मक आणि समृद्ध अनुभवामध्ये सक्रियपणे सहभागी होतील, अडथळे तोडतील आणि शिवाजी ट्रेल ट्रेकमध्ये साकारलेल्या साहसी आणि सौहार्द पूर्ण भावनेला हातभार लावतील, असा विश्वास काळे यांनी व्यक्त केला.

NCC तरुणांच्या सर्वांगीण विकासावर विश्वास आणि NCC कॅडेट्समध्ये नेतृत्वगुण, सांघिकभावना आणि इतिहासाची जाणी व निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नात शिवाजी ट्रेल ट्रेक हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. हा ट्रेक केवळ एक शारीरिक आव्हानच नाही तर सहभागींना शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक आठवणींना साक्षीदार होण्याची संधी देणे, त्यांचे नेतृत्व आणि दृढनिश्चयाचे मौल्यवान धडे शिकण्याचीही एक मोहीम आहे. दररोज विविध मान्यवरांच्या हस्ते दुसऱ्या NCC कँडेटला फ्लँग दाखविणार असून, सोमवारी आमदार सतेज पाटील, त्यानंतर शिवाजी विद्यापिठाचे कुलगुरू यांच्याहस्ते फ्लँग दाखविण्यात येणार आहे.

एक अनोखी, धाडसी मोहिम असून, महाराष्ट्रातील गड किल्ले यांचे दर्शन तसेच शिवाजी महाराज यांचा संघर्ष, यशोगाथा, त्यांची रणनितीचा अभ्यास शिकायला मिळेल. महाराष्ट्रात प्रथमच आम्ही आलो आहोत. प्रत्यक्षात पन्हाळा ते विशाळगड अशी लढाई ऐकली होती. मात्र ते ठिकाण, गड किल्ला पाहण्याचा अनुभव व आनंद मिळेल असे दाखल झालेल्या एनसीसीच्या स्टुडंट्सनी सांगितले.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.