संत नामदेव महाराज जयंती शासकीय स्तरावरती साजरी करण्याची मागणी…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

नामदेव शिंपी समाज युवक संघा कडून चंद्रशेखर बावनकुळे यांना मागणीचे निवेदन…

मुंबई – प्रसारण विभाग नामदेव शिंपी समाज युवक संघ महाराष्ट्र सोमवार 30 ऑक्टोंबर रोजी मुंबई येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना संत नामदेव महाराज यांची पुण्यतिथी किंवा जयंती शासकीय परिपत्रकात उल्लेख करून शासकीय स्तरावरती साजरी करावी यासह अनेक मागण्यांचे निवेदन नामदेव शिंपी समाज युवक संघाचे अध्यक्ष सिद्धेशजी हिरवे, मयुर हिरवे, किशोर जी कुमठेकर, सिद्धार्थ बकरे, अनंत पुणेकर सहकाऱ्यांनी आज प्रत्यक्ष दिले.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

देवेन्द्र फडणवीस यांनी मागील सरकारच्या काळात स्वतः हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. आता आपण आपल्या सरकार मध्ये याकरता प्रयत्नशील रहावे असे नामदेव शिंपी समाज युवक संघाचे अध्यक्ष सिद्धेश हिरवे यांनी बोलताना सांगितले.

यावेळी नामदेव शिंपी समाज युवक संघ महाराष्ट्र अध्यक्ष सिद्धेशजी हिरवे, रत्नागिरी जिल्हा नामदेव शिंपी समाज युवक संघ अध्यक्ष मयुरजी हिरवे, नामदेव शिंपी समाज युवक संघ उद्योग मार्गदर्शक मंडळ उपाध्यक्ष किशोरजी कुमठेकर, उद्योजक नामदेव शिंपी समाज युवक संघ उद्योग मार्गदर्शक मंडळ सदस्य सिद्धार्थ जी बकरे, सागर मांढरे, खेमराज जी नामा, महेश ढवळे – महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अ.भा. दिल्ली महासंघ, मनोज भांडारकर महाराष्ट्र राज्य संघटक अ. भा. दिल्ली महासंघ, अनंत पुणेकर – महाराष्ट्र प्रदेश युवा कार्यअध्यक्ष अ. भा. दिल्ली महासंघ, विजुनाना बिरारी- माजी राष्ट्रीय अध्यक्ष क्षत्रिय आहिर शिंपी, रामेश्वर धाडणकर- माजी राष्ट्रीय सचिव क्षत्रिय आहिर शिंपी, सुषमाताई सावळे – राष्ट्रीय महिला अध्यक्ष क्षत्रिय आहिर शिंपी, अरुणाताईत् बिरारी, दगानाना चव्हाण, सुनील भांडारकर मणिलाल शिंपी यांसह शिंपी समाजातील तर पोट जाती व त्यांचे प्रतिनिधी समाज बांधव उपस्थित होते.

 

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.