त्या घटनेला दहा वर्ष… अपंगत्वानंतर जिंकली लढाई -सचिन पिंपरे यांची ही आत्मकहाणी आदर्शवत, प्रेरणादायी

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

खरतर हा माझा पुर्नजन्मच म्हणायला हवा.. डोळ्यासमोर मृत्यू उभा होता. नव्हे तर जणूकाही माझ आयुष्यच सारं संपले असे वाटले होते. मोठा अपघात झाला होता.. चारचाकीने उडविले होते. छातीखाली सर्व भाग आहे की नाही याची जाणीवच नव्हती. परंतु, नियतीच्या मनात काही औरच होते. परमेश्वराला दया आली. माझ्यापुढे अजून काही संघर्ष.. माझी आयुष्याची दोरी अजूनही भूतलावर होती की काय म्हणूनच मी जगलो. या घटनेतून तारलो. आता या घटनेला १० वर्ष उलटून गेली. २७ मार्च २०१३ च्या या अपघात दुर्घटनेत पूर्णतः अपंगत्व आले परंतु, पुन्हा तितक्याच मेहनतीने, मित्रांच्या साथीने, घरच्यांच्या सोबतीने उभा राहिलो.

सचिन भारत पिंपरे (मु. पो. पाडोळी (ना) ता. कळंब जि. धाराशिव (उस्मानाबाद), (व्हाया मुरूड) यांची ही कहाणी. कोल्हापूर येथे त्यांच्या नव्याने माँडीफाय केलेल्या बाईकवर कावळा नाका येथे आले होते. त्यावेळी त्यांनी २ लाख रुपये खर्चून केलेली बाईक पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. मनाचा निश्चय केला, ध्येय गाठायचे ठरवले तर अशक्यही शक्य आहे, हे सचिन भारत पिंपरे यांनी करून दाखविले. 12 वी कला, आय.टी.आय. स्प्रे पेंटिंग, आय.टी.आय. प्लास्टिक प्रोसेसींग ऑपरेटर, एम. यस. सी. आय. टी., टायपिंग, स्पोकन इंग्लिश, सेल्फ डेव्हलपमेंटसारखे शिक्षण घेतलेले सचिन पिंपरे हे घरातले सांगताहेत म्हणून लग्न करण्यास तयार झाले. परंतु, तत्पूर्वी पुणे-भोसरी येथे आय. सी. इंडस्ट्रीज नोकरी मिळविली. आता लग्न करायचे ठरले. परंतु मित्रांच्या आग्रहाखातर आधी देवदर्शन करायचे. नंतर नाव, प्रसिद्धी, करीअर करून नव्या जीवनाची सुरुवात करायचे ठरले. मात्र, शिर्डीवरून येताना जेरदार अपघात झाला. या अपघातामध्येच संपूर्ण आयुष्याची घडीच विस्कटली. अपघात इतका मोठा होता. की दुचाकीला चारचाकीने जोरदार धडक दिल्याने सचिन पिंपरे हे पूर्णता छातीपासून खाली पायावर्यंत निकामीच झाले होते. डाँक्टरांनी देखिल तशी आशा सोडली होती. पुढील आयुष्य पाहू की नाही हे काहीच सांगता येत नव्हतं. सारकाही परमेश्वराच्या हातीच असे डाँक्टर, मित्र बोलताहेत इतकंच सचिन पिंपरे यांना अपघातानंतर आँपरेशन करेपर्यंत ऐकू येत होते. यातूनही सचिन पिंपरे यांनी ठरविले. नाही, आपण जगायचं आपले ध्येय पूर्ण करायचे आहे. आणि नियतीने पुन्हा जीवनाची दिशा बदलली.

पैसै नसतानाही, उसने पासने घेऊन, मदतीच्या आधाराने तीन ते चार लाखापेंक्षा अधिक रक्कम खर्च करून सचिन पिंपरे अखेर पुन्हा स्वतःच्या जिद्दीने, मेहनतीने, व्यायाम करून, प्रखर आत्मविश्वासाने उभे राहिले. ज्यांनी ज्यांनी आता सचिन पिंपरे यांच्या आय़ुष्याचे काही शेवटचेच दिवसे राहिलेत. जागेवरच ते झोपून, बसून राहणार असे सांगितले, त्यांना सचिन पिंपरे यांनी पुन्हा उभे राहून दाखविले. सचिन पिंपरे यांनी तासनतास व्यायाम केला. फिजीथेरोपी केली. विविध उपचार केले. इतकेच नव्हे तर आता स्वतःची माँडीफाय करून बाईक बनवून, ती दिमाखात घेऊन आता स्वावलंबी जीवन जगून दाखवित आहेत.

एकाबाजूला संघर्षमय जीवन सुरु असतानाच, डॉ. नसीमा दीदी अपंग लोकांवर काम करतात असे, समजले. सचिन यांनी अखेर त्यांची ओळख करून घेतली. डॉ. नसीमा दीदी यांनी सर्व हकीकत ऐकून माझे पुर्वनसन करू असा विश्वास दिला. नव्या जीवनाची आशा सचिन पिंपरे यांना दिली. रोजगाराची नवी कल्पना सांगून स्वतःच्या संस्थेतच सचिन पिंपरे यांना नव्याने स्वप्नांना उभारी दिली. दरम्यान. घरातील सर्व सेव्हींग संपले होते. आईचे दागिने विकले, शेती सावकाराकडे गहाण राखली, घर फायनान्स कंपनी कडे ठेवण्यात आले. अनेकांनी माझी व घरच्यांची ही परिस्थिती पाहून, काहींनी साथ सोडली, काहींनी जमेल तशी मानसिक, शारीरीक, आर्थिकदृष्या मदत केली. फिजिओथेरपी थेरेपीच्या डॉक्टर प्रिंसीपल सुचिता गोल्हार यांनी आर्थिक, मानसिक आधार दिला. घरच्यांनी पूर्णता आधार दिला. नसीम दीदींची भेट घेतल्यानंतर, त्यांना, त्यांची संस्था आणि मधू ताईंनी रूम्स, वस्तीगृह, फॅक्टरी दाखवली तेव्हा कळले की मी एकटाच इतका दुखीः कष्टी, निराधार नसून, माझ्यासारखेच नव्हे तर माझ्यापेक्षा अधिक अपंग असलेले लोक आपलं नव्याने जीवन जगताहेत. तेव्हा पुन्हा पक्क ठरविले की, मी देखिल उभा राहणार, करून दाखविणार आणि त्यानंतर माझ्या जीवनाचा कायापालट झाला तो आजतागातय तुम्ही पाहतायच असे अभिमानाने सचिन पिंपरे सांगताहेत.

संस्थेतील कामाच्या विस्तारतेचा विचार करून यांना कोणाच्याही मदतीशिवाय स्वतः बाहेर पडता यावे, इतर अपंगांच्या घरी जाऊन त्यांना सर्वांगीण पुनर्वासनाचे महत्व पटवून देण्यासाठी, आलेल्या अपंगत्वावर मात करत स्वाभिमानाने जीवन जगता येते हे समजण्यासाठी तसेच अन्य अपंगांना देखिल घरच्या घरी वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग  शासकीय योजनांची माहिती देता यावी यासाठी एक मोटारसायकल विकसित केली आहे.

सचिन पिंपरे,
+919767974401,
+919422402604
spimpare7@gmail.com

ज्या मध्ये अपघातामध्ये आलेल्या अपंगांना व्हीलचेअर मध्ये बसून सहज वापराता येणे शक्य आहे. संस्थेचे विश्वस्त अजीज हूरजूक यांच्या संकल्पनेतून व मेकॅनिक गणेश शिंदे व कुरणे बंधू यांच्या सहकार्याने ही मोटारसायकल विथ साईड कॅरेज (गाडीचे नाव झेप) एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये खर्च करून बनवण्यात आली आहे.ही गाडी माझ्या यशस्वी जीवनाची सारथी बनली आहे, या गाडीमुळे माझी वैयक्तिक कामे होण्याबरोबरच माझ्या अर्थाजनाची साधन बनली आहे. तसेच संस्थेच्या कामात गती ही आली आहे. काेणत्याही परिस्थीतीने, अपघाताने, जन्मतः आलेल्या  अपंगत्वाने खचून न जाता स्वतःवर विश्वास ठेवा. व‌ यातूनहि जीवनाची नवी भरारी घेता येते. फक्त प्रयत्न करा, स्वतःवर विश्वास ठेवा, यात यश नक्कीच येईल. शारीरिक अपंगत्व आले म्हणून काय झाले, मानसिक शक्ती च्या जोरावर जग जिंकता येते…
शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून हरलो नाही.

 

**प्रोजेक्टला काय उपयोग करून देता येईल ते आपण पाहूया त्याप्रमाणे नसीम दिदीनी मला क्लिनिंग अँड हायजिन डिपार्टमेंट दिलं. त्यामध्ये मला संस्थेकडून सुरुवातीला विद्यावेतन सुरू केले. पहिल्या वेळेस जेव्हा विद्यावेतन दोन हजार रुपये माझ्या हातात मिळाले तेव्हा असं वाटले की अर्ध्या पेक्षा जास्त शरीर निकामी असताना मी प्रत्यक्षात वीस हजार रुपये कमवले तो जो आनंद होता तो शब्दात मांडण्या इतका साधा नव्हता.अपघातानंतरची पहिली कमाई म्हणून मी त्यातील काही रक्कम संस्थेस देणगी म्हणून दिली व काही रक्कम आई वडिलांना दिली. आपल्या संस्कृतीमध्ये असेल मानले जाते की आयुष्यातील पहिली कमाई आपण आई-वडिलांच्या हातामध्ये द्यावी का तर आई-वडिलांनी आपल्याला घडवण्यासाठी पूर्ण आयुष्य पणाला लावलेल आहे त्याचप्रमाणे मी संस्थेला देणगी देण्याचे कारण असे होते की मी ज्या अवस्थेत होतो त्या अवस्थेत संस्थेने मला स्वीकारलं व काहीतरी करून दाखवण्यासाठी सक्षम बनविले. या गाडीमुळे संस्था, माझी वैयक्तिक कामे होण्याबरोबरच माझ्या अर्थाजनाची साधन बनली आहे. आता तर तुम्ही पाहताय.. मी माझी स्वतःची दोन लाख रुपये खर्चून तयार केलेली बाईक घेऊन फिरतोय.. कामासाठी घेतलेली ही बाईक, नव्या जीवनाची सारथी बनलीय.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.