दि शिरपूर मर्चंट्स को-ऑप बँकेत कर्जवाटपाच्या प्रत्येक क्षेत्रात आवडत्या व्यक्तींना नियमबाह्य पद्धतीने कर्ज वितरण…
शिरपुर – ‘द शिरपुर मर्चंट्स को-ऑप बँक बचाव समिती’ स्थापन करून थेट बँकिंग लोकपाल, सहकार आयुक्त पुणे, सहकार सहनिबंधक,नाशिक, जिल्हा उपनिबंधक धुळे यांच्याकडे या बँकेविरोधात गंभीर तक्रारी दाखल झाल्या आहेत. चेअरमन प्रसन्न जैन यांचा मोठा भाऊ हर्षद जयराज जैन याने ३० लाख रुपयांचे बेकायदेशीर व अनियमित कर्ज वाटप केल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्याचा धाकटा भाऊ केतन जयराज याच्या नावावरही लाखोंचे बेकायदेशीर कर्ज वाटप करण्यात आल्याचे उघड झाले आहे. गुप्ततेच्या नावाखाली मॅनेजर आणि काही लोक गंभीर गैरप्रकार दडपण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ही बँक सध्या फारच तोट्यात आहे.
![]() |
![]() |
77 टक्के एनपीएचा भार वाहणाऱ्या या बँकेचे कंबरडेच गंभीर आर्थिक गैरप्रकारामुळे मोडीत निघाल्याचे स्पष्ट होत आहे.त्याला चेअरमन व मॅनेजर प्रामुख्याने जबाबदार असून, अन्य महत्त्वाची कारणेही लेखापरीक्षण अहवालात उघड झाली आहेत.या लेखापरीक्षण अहवालात नोंदवलेल्या दोषांचे दुरुस्ती अहवाल मागील दहा-बारा वर्षांहून अधिक काळ डीडीआर कार्यालयात सादर करण्यात आलेले नाहीत.यासंदर्भातही ‘द शिरपूर मर्चंट्स को-ऑप बँक बचाव समिती’ चे जागरूक सदस्य गोपाल के मारवाडी, मोहन साहेबराव पाटील, ओंकार आबा जाधव, डॉ. सरोजताई डी. पाटील, भरत बी. रोकडे, हिराभाऊ कोळी आदींनी वरिष्ठ पातळीवर लेखी तक्रारी केल्या आहेत. या बँकेत 50-50 लाख रुपयांची बेकायदेशीर व असुरक्षित कर्जे व कोणतेही तारण न ठेवता, संचालक मंडळाच्या जवळच्या रक्तनातेवाईकांना कोट्यवधी रुपयांची कर्जे चेअरमन व संचालक मंडळातील निवडक परिचितांना खैरातीप्रमाणे वाटण्यात आली आहेत. सर्वसामान्यांना कडक नियम आणि कायदे दाखवून इतर नजीकच्या लोकांना तद्दन नियमबाह्य क़र्ज़वाटप करणाऱ्या अनेक तथाकथित व्हाईट कॉलर लोकांची नावे समोर आली असून, ती प्रसिद्ध होताच जिल्ह्याभरात खळबळ उडेल.
आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
चेअरमन अपात्रतेची घोषणा कधी?. गेल्या 10 ऑक्टोबर रोजी अध्यक्षांच्या अपात्रतेबाबतच्या तक्रारीची झालेल्या पहिल्या सुनावणीवेळी अध्यक्ष प्रसन्न जैन स्वत: गैरहजर होते. दुसरी व अंतिम सुनावणी १३ ऑक्टोबर रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या समोर पूर्ण झाली असून, आता या प्रकरणी एक -दोन दिवसांतच होणा-या निर्णयाकडे संपूर्ण तालुकाचं नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अध्यक्ष प्रसन्न जैन हे अपात्र घोषित होताच याप्रकरणी तपासझोत अनेक तथाकथित प्रभावशाली लोकांपर्यंतही पोहोचू शकतो. कारण या बँकेच्या आर्थिक बाबींची जबाबदारी ज्यांच्यावर होती, गत दहा वर्षांपासून तेच अध्यक्ष आणि काही अपवाद वगळता तेच संचालक मंडळ पदावर विराजमान आहे.
कुंपणच शेत खायला निघाले तर…….? ते आजपर्यंत कोणता कारभार पाहत होते? दाखवायला बाहेर काहीतरी वेगळं आणि आतून वेगळेच? असा सवाल आता सर्वसामान्य भागधारकांकडूनही उपस्थित केला जात आहे. प्रामुख्याने बँक मॅनेजर संजय कुलकर्णी आणि व्यवस्थापनाने सामान्य भागधारकांना त्यांच्या मागणीनुसार आणि त्यांच्या गरजेनुसार कर्ज देण्यास कठोर नियम कायदे दाखविले आणि मर्जीतील लोकांना तात्काळ आणि नियमबाह्य पद्धतीने मनमानी पद्धतीने बेकायदेशीरपणे कोट्यावधी रुपयांचे कर्ज तात्काळ दिलेले आहे.हे कोट्यावधी रुपयांचे नियमबाह्य कर्ज कोणत्या कारणांसाठी वापरले गेले आहे? बेनामी मालमत्ता खरेदी, अवैध दोन नंबरचे धंदे किंवा अन्य काही वेगळ्याच कारणासाठी या कर्जांचा वापर झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
मर्जीतील लोकांना दिलेल्या लाखोंच्या तसेच कोट्यावधी रुपयांच्या विनातारणी व नियमबाह्य क़र्ज़ांची माहिती सिबिल पोर्टल वर दिसते का? ही तपासणी तातडीने करण्याची गरज आहे.’ दि शिरपूर मर्चंट्स को-ऑप बँक बचाव समितीने यामागे काय रहस्य दडले आहे? याला जबाबदार असलेल्या सर्वांवर कार्रवाई करावी ही मागणी केली आहे. *एकाच उद्देशाने स्थापन झालेल्या दोन सहकारी संस्थेत संचालक पदावर कार्य करता येत नाही. असा सहकारी संस्थेत कायदा आहे. तरीही काही लोकं दोन ठिकाणी पदाचा उपभोग घेताहेत. लवकरच ‘दि शिरपुर मर्चंटस को- ऑप बँक बचाव समिती’ तर्फे या लाभार्थ्यांचा ही पर्दाफाश केला जाईल.
सहकार खाते मात्र पध्दतशीरपणे झोपेचे सोंग घेत मौन बाळगून आहे, असे दिसते. म्हणजे ‘दि शिरपुर मर्चंटस को-ऑप बँक बचाव समिती’च्या पदाधिकाऱ्यांनी या बँकेच्या प्रत्येक घोटाळा प्रकरणांत तक्रारी दाखल कराव्यात अशी सहकार विभागाला अपेक्षा आहे का? कारण तुम्ही भ्रष्टाचार जितका दाबताहेत तितका तो अधिक विस्फोटक होत जातोय. आणि दिवसेंदिवस नित्यनवी प्रकरणे बाहेर निघतील. मराठीतील एक म्हण यावर तंतोतंत लागू पडते ती म्हणजे “पापाला नाही मायबाप, पाप फुटे आपोआप !”
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.














































































