राज्यातील हॉटेल कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळ करणार – ना. सुरेश खाडे, आमदार आबिटकर यांच्या मागणीला यश…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विनायक जितकर

कामगार मंत्री ना. सुरेश खाडे यांना निवेदन देताना आमदार आबिटकर सोबत शिवसेना तालुकाप्रमुख विजय बलुगडे, प्रकाश बुरूड आदी.

कोल्हापूर – राज्यातील कोट्यवधी हॉटेल कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून न्याय देणार असल्याचे कामगार मंत्री सुरेशराव खाडे यांनी जाहीर केले असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे. या संदर्भात आमदार प्रकाश आबिटकर यांच्या मागणीच्या अनुषंगाने मंत्रालय, मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, राज्यात असंघटीत कामगारांची संख्या मोठी आहे. अशा कामगारांसाठी उद्योग व व्यवसाय निहाय वेगवेगळी कामगार कल्याणकारी मंडळे स्थापन करण्याची मागणी होत असते. या सर्व कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी त्यांची नोंदणी व त्यांच्याकरीता कल्याणकारी योजना राबविण्यासाठी निधीची तरतूद व त्यांचे वितरण करण्याकरीता महामंडळाची स्थापना करणे गरजेचे असते. यामुळे राज्यातील हजारो हॉटेल कामगारांना न्याय देण्यासाठी त्यांच्याकरीता स्वतंत्र महामंडळाची स्थापना करावी अशी मागणील आमदार प्रकाश आबिटकर यांचेकडून वारंवार करण्यात येत होती. त्या मागणीच्या अनुषंगाने राज्याचे कामगदार मंत्री नाम.सुरेश खाडे यांचेकडे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलतना कामगार मंत्री नाम.सुरेश खाडे म्हणाले की, राज्यातील असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी असंघटीत कामगार कल्याण महामंडळ आणि त्याच्या अंतर्गत व्यवसाय, उद्योग क्षेत्रनिहाय ३९ आभासी मंडळे स्थापन करण्याचाबाबतचा निर्णय केंद्राने घेतला आहे. या 39 आभासी मंडळांमध्ये हॉटेल कामगांराच्या देखील मंडळाचा समावेश करून राज्यातील हजारो हॉटेल कामगारांना न्याय देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.