विनायक जितकर
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातून जनसंवाद पदयात्रा…
आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
हातकणंगले – जनसंवाद यात्रेला तालुक्यात तरुणांचा उत्साह, ठिकठिकाणी यात्रेवर होणारी पुष्पवृष्टी, अशा उत्साहपूर्ण वातावरणात आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने हेर्ले येथून जनसंवाद पदयात्रेला सुरवात झाली. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद पदयात्रा सुरू आहे. आज रविवारी हेर्ले येथील शिवमुद्रा हॉटेल येथून सकाळी ७.३० वाजता या पदयात्रेला प्रारंभ झाला. पदयात्रा हेर्ले, माले फाटा, मुडशिंगी फाटा, चोकाक, अतिग्रे येथून पुढे नेहरूचौक हातकणंगले येथे पदयात्रेची जाहीर संवाद सभा झाली.
![]() |
![]() |
- पदयात्रेत आमदार सतेज पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयंत आसगावकर, नगराध्यक्ष अरुण जानवेकर, तालुकाध्यक्ष भगवान जाधव, सर्जेराव माने, बाजीराव सातपुते, उतम पाटील, उतम सांवत, गिरीप इंगवले, डॉ अभिजीत इंगवले, शकील अत्तार, सुकुमार चव्हाण, आनंदराव पाटील, सरदार पाटील, मुकुंद पाटील, चद्रंकात माने, आण्णा शिंदे, सुजीत समुद्रे, तानाजी घोडेस्वार, महेश कोरवी, रणजीत निकम, किरण मोहीते, अँड दौलतराव मोहीते, फरिदा मुजावर, प्रमिला पाटील, आक्काताई पाटील, सुजाता पाटील, अर्चना जानवेकर, सविता पाटील, गोकुळचे संचालक बाबासो चौगले, बयाजी शेळके, प्रकाश पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.















































































