काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेला कोल्हापुरातून उस्फुर्त प्रतिसाद…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विनायक जितकर

जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातून जनसंवाद पदयात्रा…

कोल्हापूर – पावसाच्या सरी, हलगी, ढोल-ताशांचा निनाद, तरुणांचा उत्साह, ठिकठिकाणी यात्रेवर होणारी पुष्पवृष्टी, अशा उत्साहपूर्ण वातावरणात शनिवारी कोल्हापुरातील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर परिसरात जनसंवाद पदयात्रा काढण्यात आली. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद पदयात्रा सुरू आहे. आज आपटेनगरच्या चिवा बाजारापासून सायंकाळी ४ वाजता या पदयात्रेला प्रारंभ झाला. पदयात्रेत आमदार ऋतुराज पाटील, श्रीमती जयश्री जाधव, मधुरिमाराजे छत्रपति सहभागी झाले होते.

  • यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बिनखांबी गणेश मंदिर येथे जनसंवाद यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर के पोवार, रामराजे कुपेकर यांनी स्वागत केले. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, आनंद माने माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, मधुकर रामाने, तौफीक मुल्लाणी दिपा मगदूम प्रतिक्षा पाटील, दता बामणे, वनिता देठे, दुर्वास कदम, सर्जेराव साळोखे किशोर यादव रवि आवळे युवराज गायकवाड राहूल माने संतोष जरग काका पाटील अर्जुन माने अजय इंगवले आण्णा बराले किसन कल्याणकर जयकुमार शिंदे, राजाराम गायकवाड ईश्वर परमार निलोफर आजरेकर विक्रम जरग करन शिंदे जयसिंग रायकर धनाजी आमते उमा बनछोडे राजू साबळे अक्षय शेळके दिपक थोरात सुरेश कुहाडे, आदी उपस्थित होते.
  • तसेच महानगरपालिका चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने पदयात्रेच स्वागत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, शहर प्रमुख सुनील मोदी रविकिरण इंगवले अवधूत साळोखे कमलाकर जगदाळे महेश उत्तरे प्रज्ञा उत्तुरे माधुरी दळवी जाधव विशाल देवकुळे मंजीत माने यांनी केले. जनसंवाद रॅलीची सुरुवात नवीन वाशी नाका येथून करण्यात आली. ही पदयात्रा सानेगुरुजी वसाहत, तलवार चौक संभाजीनगर नंदिवली चौक बिनखांबी गणेश मंदिर महाद्वार रोड पापाची तिकटी महानगरपालिका सीपीआर चौक ते दसरा चौक येथे जाहीर सभा होवून रॅलीची सांगता करण्यात आली.

या सभेला आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार श्रीमती जयश्री जाधव, आमदार जयंत आसगाकर, मधुरिमाराजे छत्रपति, सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख, बाजीराव खाडे, सुरेश कु- हाडे, तौफीक मुल्लाणी, सरलाताई पाटील, निलोफर आजरेकर, संध्या घोटणे, भारती पोवार, उदय पोवार, शशिकांत खोत, वैभव तहसिलदार, गोकुळचे संचालक बाबासो चौगले, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, बाजार समितीचे सुयोग वाडकर, कुमार आहुजा यांच्यासह माजी नगरेसवक नगरसेविका कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.