एकल महिलांना आनंदाचा शिधा वितरण करताना योग्य नियोजन करावे – नीलम गोऱ्हे

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुरवठा विभागाला सूचना…

पंढरपूर – सणासुदीच्या काळात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार मागील वर्षी दिवाळीमध्ये तसेच गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिधाचे रास्त दुकानातून वितरण करण्यात आले होते. आता गौरी गणपती सणानिमित्त आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आनंदाचा शिधाचे वितरण करताना पुरवठा विभागाने एकल महिलांना शिधा वितरण करताना कोणताही त्रास होणार नाही याबाबत योग्य नियोजन करावे, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांनी केल्या.

शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस प्रांताधिकारी गजानन गुरव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले, तहसीलदार सुशील बेल्हेकर, उपविभागीय अभियंता भीमाशंकर मेटकरी तसेच उपमुख्याधिकारी सुनील वाळुंजकर उपस्थित होते. यावेळी उपसभापती नीलम ताई गोऱ्हे यांनी पंढरपुरातील तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत सुरू असलेल्या व झालेल्या कामांची माहिती घेतली. पंढरपूर शहर व तालुक्यातील पाणीटंचाई, चारा टंचाई याबाबत सद्यस्थिती जाणून घेतली. तसेच मंदिर समिती मार्फत करण्यात येणाऱ्या कामांची माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. त्याचबरोबर संभाव्य दुष्काळ परिस्थिती लक्षात घेता रोजगार हमीची कामे तत्काळ सुरू करावीत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी पंढरपूर शहर व तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाई , चारा टंचाई बाबत करण्यात येणाऱ्या नियोजनाची माहिती दिली. तसेच तालुक्यात कमी पावसामुळे पेरणीचे प्रमाण कमी झाले असून ४० टक्के उत्पादकता कमी झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर आनंदा शिधा वितरणाबाबत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी दिली.

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.