गगनबावडा तालुक्यात विकासाची पहाट केव्हा उजाडणार?

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

चंद्रकांत पाटील-गगनबावडा 

निसर्गाची अद्भुत देणगी लाभलेल्या गगनबाडा तालुक्यामध्ये विकासाची पहाट कधी उगवणार ?असा सवाल केला जात आहे. गगनबावडा तालुका अडी अडचणीचा तालुका असून सह्याद्रीच्या डोंगरकपारीपर्यंत गावे, वाडया, धनगरवाडे आपले अस्तित्व राखून आहेत. गगनबावडा तालुक्यातील कोकण व गोवा या महत्वाच्या बाजपेठांना जोडणारा मार्ग देखील खड्यांच्या साम्राज्यांनी माखलेला आहे.कोदे खोरी, व धुंदवडे खोरीतील रस्ते हे पक्के की कच्चे हे ओळखेनासे झाले आहेत .इतर पोटररस्त्यांची अवस्था तर बघण्यापलीकडे आहे. निसर्गाच्या सानिध्यातील लेणं समजणाऱ्या व बोरबेट परिसराचे नावलौकिक करणाऱ्या मोरजाईचा सडा या पठाराची अवस्था फार बिकट आहे. हा सडा आपले अस्तित्व विसरून जावून पूर्ण भग्नावस्थेकडे जावू लागला आहे.

आजच आपल्या हक्काची लक्झरीयस बस निवडा.. आरामदायी, आनंददायी प्रवास करा

औधोगिक प्रकल्प उभे करण्यासाठी तालुक्यात मोठा वाव असून राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाखाली कोणीही पुढे नाही. बेरोजगारीचे प्रमाण तालुक्यात मोठ्या प्रमाणात असून अनेक तरुण पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे छोटी -मोठी कामे करीत आहेत. तालुक्यात निसर्गाला अनुसरून नैसर्गिक संपत्तीचा उपयोग करून जंगलात अमाप प्रमाणात उपलब्ध होणारा कडीपत्ता, शिकेकाई, तमालपत्री, गारदल, हिरडा, हेळा याला अनुसरून एखादा प्रकल्प उभारल्यास बेरोजगारांना रोजगार मिळेल. परंतू आतापर्यंत यावर कोणीही विचार केलेला नाही. निसर्गातील असणारी संपत्ती तालुक्याबाहेरील व्यक्तीला मक्तेदारीवर दिला जातो. त्याचप्रमाणे तोही त्याची लूट केलेली दिसून येते.

गगनबावडा तालुक्यातील डॉ.डी.वाय. पाटील सहकारी साखर कारखाना एकमेव तालुक्याचा आशेचा किरण आहे. साळवण येथील जंगलात उंचावर असणारे भवानीचे मंदिर,पळसंबे येथील निसर्गसौदर्याने नटलेले रामलिंग, तळये येथील वळताई, असंडोली येथील रासाईचे मंदिर, किल्ले गगनगड ही तालुक्यातील मुख्य धार्मिक स्थळे आहेत. येथे दररोज भाविक ये-जा करतात. ही देवस्थाने पर्यटनस्थळे म्हणून विकसित होणे गरजेचे आहे.

आतापर्यंत एकाही विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणावे तसे यश मिळालेले नाही. त्यासाठी कोणतीही सुविधी देखील तालुक्यात उपलब्ध नाही. मात्र जवळच येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत एकगठ्ठा मतदान डोळ्यासमोर ठेवून आतापासून हालचाल करणाऱ्या नेत्यांना मतदारराजा अनेक जीवनावश्यक सुविधांबाबत प्रश्न विचारून भांबावून सोडवत आहेत.

ही बातमी अधिक वाचकांनी वाचली- हा तर खडतर…. घाट भुईबावडा! प्रवास धाेकादायक; दुर्लक्ष बांधकामचे

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.