भावी पिढीसाठी कृषी व कृषी पूरक अभ्यासक्रम शिक्षण आवश्यक – दत्ताजीराव उगले

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विनायक जितकर

युवा ग्रामीण विकास संस्था संचलित कृषी महाविद्यालय पाल (गारगोटी) येथील कृषी महाविद्यालयात नवोदितांचे स्वागत…

गारगोटी – कृषी महाविद्यालय हे या भागात नव्याने सुरु झालेले असले तरीही महाविद्यालयाचा भविष्यकालीन दर्जा हा वाखाणण्या योग्य असेल. महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर आणि अभ्यास महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना घेता येईल, असे प्रतिपादन राहुरी कृषी विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य दत्ताजीराव उगले यांनी केले.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

युवा ग्रामीण विकास संस्था संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न कृषी महाविद्यालय पाल (गारगोटी) येथे नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत व शिक्षक दिन असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्षस्थानी राहुरी कृषी विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य दत्ताजीराव उगले होते. यावेळी बोलताना गारगोटी हायस्कूल व श्री. समर्थ ज्यूनिअर कॉलेजचे प्राचार्य मिलिंद पांगिरेकर म्हणाले, या कृषी कॉलेजच्या वतीने नावीन्यपूर्ण उपक्रमासह कृषी पूरक व्यवसाय प्रक्रिया केंद्र, रोपवाटिका संशोधन केंद्र असे उपक्रम राबवून भविष्यातील पिढी ही कृषी तंत्रज्ञानात परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. या कॉलेज मधील विदयार्थ्यांनी कृषी क्षेत्रात नवीन संशोधन करुन स्वतःसह कॉलेजचे नाव उंचवावे.

यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमासाठी गारगोटीचे माजी सरपंच भाई आनंदराव आबिटकर, प्राचार्य शांतीकुमार पाटील, संस्था प्रतिनिधी अवधूत परुळेकर, प्र.प्राचार्या डॉ. गोसावी यांच्यासह महाविदयालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विदयार्थी वर्ग उपस्थित होता. शेवटी आभार प्र.प्राचार्या डॉ. गोसावी यांनी मानले.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.