पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
चंदगड / वार्ताहर
कारण तसे अगदी किरकाेळ हाेते. समस्यसपणाने, मध्यस्थी करून देखील सुटले असते. परंतु, घडल विपरीतच.. जाब विचारायला गेले आणि प्रकरण थेट मारामारी पर्यंत पाेहचले. त्यातच माेठा वादविवाद डाेक्यात मारण्यापर्यंत मजल जाऊन गंभीर जखमी हाेईपर्यंत मारामारी वाढली आणि अखेर घडलेला सारा प्रकार थेट पाेलीस ठाण्यात जाऊन पाेहाेचला, त्यानंतर मात्र काेर्टात न्याय निवाडा हाेऊन पाच वर्षा पर्यंतची शिक्षा सुनानवली गेली. आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
घराच्या पावळणीचे पाणी बोळात पडते. त्याला पन्हाळी बसवण्याच्या कारणावरून वादविवाद झाला. त्यानंतर त्याचे पर्यावसन मारामारीत हाेऊनत डोक्यात मारून गंभीर जखमी केले . या झाल्या प्रकाराची तक्रार किसन संजय नागुर्डेकर (रा.जंगमहट्टि ता.चंदगड ) यांनी पाेलिसांना दिली. दिलेल्या फिर्यादीवरून रामू भागोजी नागुर्डेकर (मयत),यांच्या घराच्या पावळणीचे पाणी किसन नागुर्डेकर यांच्या घराचे मध्यभागी असलेल्या बोळात पडत होते.याबाबत नागुर्डेकर यांनी वेळोवेळी पन्हाळी बसून घ्या , असे सांगितले होते.पण रामू नागुर्डेकर यांनी घराच्या छतास पन्हाळी बसून घेतली नाही.
या कारणावरून आठ वर्षापूर्वी म्हणजेच, 28/06/2016 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास जंगमहट्टी येथे किसन नागुर्डेकर वास्तव्यास असलेल्या घराच्या दारात रामू नागुर्डेकर, ईश्वर रामू नागुर्डेकर,सौ.शांता रामू नागुर्डेकर,अनिल रामू नागुर्डेकर जोतिबा ऊर्फ गणपती बसवंत नाकाडी, एकत्रित येऊन जमाव करून किसन नागुर्डेकर यांच्या आईला शिवीगाळ केली. धक्काबुक्की केली.तसेच रामू भागोजी नागुर्डेकर यांनी आज यांना संपवतो असे धमकाविण्याबराेबरच थेट फावड्याने डोक्यात मारून किसन यांच्या आईला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन गंभीर जखमी केले.तसेच किसन यांना देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात ते दाेघेही गंभीर जखमी झाल्याने याविषयी गंभीर दुखापत करणे, जीवे मारण्याचा प्रकार असे गुन्हे दाखल करण्यात आले. यानंतर या प्रकरणाचा तपास हाेऊन हे न्यायालयात पाेहाेचले असता, गडहिंग्लज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश,ओंकार.आर.देशमुख यांनी सर्व आरोपींना दोषी ठरवून 05 वर्षे साधी कैद व प्रत्येकी 10,000/- रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 01 वर्षे साधी कैद,अशी शिक्षा सुनावली आहे.
या गुन्ह्याचा तपास चंदगडचे पाेलीस उपनिरीक्षक दिलीप तिबिले, सेवानिवृत्त झालेले ,शरद माळी यांनी केला. या प्रकरणाचे न्यायालयीन काम निवृत्त,सरकारी वकील ज्ञानेश्वर लक्ष्मण मोरे यांनी पाहिले.उपविभागीय पोलीस अधिकारी गडहिंग्लज राजीव नवले,निरीक्षक चंदगड पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी मार्गदर्शन केले.

|
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.
Post Views: 237