तीन लाखाचे बक्षिस जिंकणार काेण” काेल्हापुरात रंगणार दहीहंडीचा थरार!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

७ सप्टेंबरला युवाशक्ती दहीहंडीचा थरार रंगणार, पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य आणि लोकप्रिय युवाशक्ती दहीहंडीसाठी प्रथम क्रमांकाला ३ लाख रूपयांचे बक्षीस  

काेल्हापूरृ- यावर्षी पुन्हा एकदा कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात, धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजपच्यावतीने दहीहंडीचा थरार  आणि जल्लोष रंगणार आहे. यावर्षी गुरूवार दि. ७ सप्टेंबर  २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेला प्रारंभ होईल. संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि गाजलेल्या युवाशक्तीच्या दहीहंडी स्पर्धेतील ३ लाख रूपयांचे बक्षिस पटकावण्यासाठी गोविंदा पथकांची चुरस रंगणार आहे.

स्पर्धेच्या उद्घाटनाला राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, पंकजा मुंडे यांच्यासह जिल्हयातील अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेमधील विजेत्या गोविंदा संघाला रोख ३ लाख रूपयांचे पारितोषिक दिले जाईल. शिवाय युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेत सहभागी होणार्‍या प्रत्येक गोविंदा पथकाला, प्रोत्साहन देण्यासाठी अन्य बक्षिसांचा वर्षाव केला जाईल. पहिल्याच प्रयत्नात सहा थर रचून सलामी देणार्‍या गोविंदा पथकाला १० हजार रूपये, तर सात थर रचून सलामी देणार्‍या गोविंदा पथकाला १५ हजार रूपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच सर्वात वरच्या थरावर चढून, दहीहंडी फोडणार्‍या गोविंदाच्या सुरक्षेेसाठी विशेष उपाय योजना करण्यात आली आहे. त्यासाठी समीट ऍडव्हेंचरचे विनोद काम्बोज आणि हिल रायडर ऍडव्हेंचर फौंडेशनचे प्रमोद पाटील यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. शिवाय एखादा गोविंदा कार्यकर्ता जखमी झाल्यास त्याच्यावर तत्परतेने उपचार करण्यासाठी समीट ऍडव्हेंचरचे आणि हिल रायडर सेवेला हजर राहणार आहेत.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.