लक्ष आगारप्रमुखांच्या भूमिकेकडेः गणेशाेत्सवापूर्वी मिरज-काेल्हापूर माखजन बस सुरु करा– ग्रामस्थांचा ठराव

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

अनिकेत बिराडे- काेल्हापूर

कोल्हापूर: कोकणातील असंख्य कोकणवासीयांना मिरज येथे येण्यासाठी थेट एसटी बस नाही, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील माखजन गावातील ग्रामपंचायतने ‘मिरज- माखजन’ अशी मुक्कामी एसटी बस सुरु करावी, असा ठराव केला आहे. ‘मिरज-माखजन, कोल्हापूर मिरज’ अशी एसटी बस गणेशोत्सव पूर्वी सुरू करावी अशी मागणी मिरज विभाग प्रमुख तसेच सांगली विभागीय कार्यालय यांच्याकडे केली आहे. तसेच काेल्हापूर, मिरज- माखजन काेल्हापूर असा देखिल पर्यायी मार्ग त्यांनी सुचविला आहे. काेल्हापूर आगार देखिल ही एसटी. बस मिरजपर्यंत सुरु करू शकतात, असे मत नागरिकांंनी व्यक्त केले आहे. त्यामुळे हा ग्रामस्थांचा ठराव लक्षवेधी ठरणार का याकडे संपूर्ण माखजनवासियांसह पंचक्राेशीतील वीस गावातील हजाराे नागरिकांचे लक्ष लागून आहे. 
ग्रामपंचायत माखजन मध्ये १००% सर्वानुमते  ‘मिरज- सांगली-काेल्हापूर माखजन’ मुक्कामी एसटी बसचा ठराव मंजूर झाला आहे. माखजन व दशक्रोशीतील २० विभागातून ‘मिरज सांगली कोल्हापूर’ या परिसरात असणाऱ्या कर्मचारी व ग्रामस्थांना वैद्यकीय उपचारासाठी वारंवार वेळोवेळी जावे-यावे लागते. त्यामुळे ही बस अत्मयंत महत्वाची तसेच उपयुक्त आहे.सद्या माखजन येथून कोल्हापूर-सांगली-मिरज अशी थेट बससेवा नाही परिणामी, प्रवाशांना आरवली, संगमेश्वर, देवरुख साखरपा या चिपळूण मार्गे अनेक बसेस बदलून मिरज पर्यंत मार्गस्थ व्हावे लागते आहे.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

असंख्य सर्वसामान्य प्रवाशी, नाेकरदार, रुग्ण यांच्यासाठी मिरजला जाण्यासाठी ही बस अत्यंत महत्वाची आहे. यापूर्वी सुमारे ३५ वर्षापेक्षा अधिक काळ काेल्हापूर माखजन अशी मुक्कामी बससेवा सुरु हाेती. ती कालांतराने बंद झाल्यानंतर माेठी गैरसाेय हाेत आहे. काेल्हापूरला सातत्याने बससेवा चिपळूण तसेच संगमेश्वर देवरुख मार्गे आहे, परंतु, मिरजला थेट अशी बससेवा नाही, तसेच माखजन हे गाव पूर्वीपासून बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. तरी मिरज या काेल्हापूर आगारप्रमुखांनी याचा गांभिर्याने तसेच प्रवाशी हित डाेळ्यासमाेर ठेवून मिरज काेल्हापूर माखजन अशी बस सेवा सुरु केल्यास, आगाराला नक्कीच फायदा हाेईल, व माखजनमधील दशक्राेशीतील नागरिकांसह देवरुख, साखरापर्यंतच्या नागरिकांना थेट मिरजपर्यंत बससेवा मिळेल असा विश्वास आहे. तरी ग्रामपंचायतीने केलेल्या ठरावाची दखल आगारप्रमुख घेतील हीच आशा.

संतोष तुकाराम पाडळकर, कार्याध्यक्ष  

एसटी प्रवासी संघटना.

यामुळे याचा नाहक मानसिक त्रास तसेच आर्थिक भुर्दंड प्रवाशी नागरिकांना सहन करावा लागत आहे. तरी सामान्य प्रवासी आणि रुग्णांना कोल्हापूर सांगली मिरज येथे जाणे-येणे सुलभ व्हावे, या दृष्टीने ‘मिरज कोल्हापूर देवरुख मार्गे माखजन’ अशी वस्ती बसफेरी लवकर सुरु करावी.अशी मागणी 10 ऑगस्ट रोजी मासिक सभा घेऊन सर्वानुमते ठराव मंजूर झालेला आहे. त्यामुळे ही बस सुरु हाेईल असा विश्वास समस्त ग्रामस्थांना आहे. आगारप्रमुखांनी देखील यावर उत्पन्नाचा तसेच नागरिकांची माेठी साेय या माध्यमातून विचार करून ही बस सुरु केल्यास फायदाच हाेईल असे मत व्यक्त केले आहे.

श्रावण मासानिमित्त चिपळूण येथे मोफत आयुर्वेदिक चिकित्सा व उपचार शिबीर…

बाईक खरेदी करायची तर इथंच

सोनं द्या लोन संपवा!आजच कर्जमुक्त व्हा!
 

 

चांगल्या बातम्या, साठी पाँझिटीव्ह वाँच नेहमीच आपल्यासाेबत.. लाईक करा, सबस्क्राईब करा.. 

पाेलीस मित्र, शासनमित्र, पत्रकार मित्र, समाज मित्र साठी आपणही सदस्य नाेंदणी करू शकता…

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.