२१७ बंदीनी सांस्कृतिक कार्यक्रम आणि रक्षाबंधन उपक्रमाचा घेतला लाभ…
कोल्हापूर – जाणते अजानतेपणी त्यांच्या हातून गुन्हा घडला. त्याची शिक्षा ते आज भोगत आहेत. त्यामुळ त्यांच स्वातंत्र्य हिरावलं गेलं. कुटुंबांपासून ते दुरावले गेले. कोणताही सण, समारंभ, उत्सव त्यांना साजरा करता येत नाही. ही अनुभूती कारागृहात मिळण्यासाठी आज बिंदू चौक कारागृह प्रशासनाच्या पुढाकारातून आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीन बंदीजनांसाठी रक्षाबंधन उपक्रमाच आयोजन करण्यात आले होते. या निमित्तान त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमाची पर्वणी देखील मिळाली. तीन तास बंदी जणांच निखळ मनोरंजन देखील झाले.
![]() |
![]() |
कोल्हापुरातील बिंदू चौक कारागृहात २१७ बंदीजन शिक्षा भोगत आहेत. कळत नकळत हातून घडलेल्या गुन्ह्या बद्दल त्यांना पश्चाताप होतोय. कुटुंबीयांपासून लांब असलेल्या, सण – समारंभाचा आनंदही घेऊ न शकणाऱ्या या बंदीजणांसाठी बिंदू चौक कारागृह प्रशासनाच्या वतीन गीत संगीत सांस्कृतिक कार्यक्रम आणि भागीरथी महिला संस्थेच्या पुढाकारातून कारागृहात रक्षाबंधन उपक्रमाच आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी कारागृह अधीक्षक विलास कापडे यांनी मान्यवरांच स्वागत केले. अनहद ग्रुपच्या एम. जी. शेटे यांच्या पुढाकारातून गाण्यांचा कार्यक्रम सादर झाला. विजया कुरणे, विकास कामत, श्रीकांत कुरणे यांनी विविध देशभक्तीपर तसंच हिंदी चित्रपट गीत सादर करून बंदीजणांचं निखळ मनोरंजन केले. काही गीतांवर बंदीजणांनी नृत्याचा आनंद देखील घेतला. दरम्यान पंकज घोलप या बंदीजणांन अप्रतिम चित्रपट गीत सादर केले. तर प्रकाश पुजारी यांन माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची कविता सादर करून उपस्थितांची मन जिंकली. अशा उपक्रमातून कारागृहात चांगल्या, सकारात्मक वातावरणाची निर्मिती होते. बंदीजन आपली दुःख काही तासांसाठी विसरून जातात. त्यामुळ भविष्यात देखील या पद्धतीचे सांस्कृतिक उपक्रम बिंदू चौक कारागृहात राबवण्याचा मानस कारागृह अधीक्षक विलास कापडे यांनी व्यक्त केला.
आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
तसेच भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी गेल्या १४ वर्षापासून राबवलेल्या उपक्रमांच देखील त्यांनी कौतुक केले. यानंतर भागीरथी महिला संस्थेच्या वतीन सुनिता पाटील, श्रद्धा पताडे, सुषमा पाटील, दीपा पाटील यांनी कारागृह अधीक्षक विलास कापडे, तुरुंगाधिकारी नागनाथ खैरे, सुभेदार विजय कुंभार, शिपाई महेश आडनाइक यांचे औक्षण करून त्यांना राखी बांधली. तसंच २१७ बंदीजणांना भाऊ माणून त्यांना स्नेह बंधनात अडकवले. राखीचा पवित्र धागा बांधून त्यांनाही रक्षाबंधनाची अनुभूती दिली. भागीरथी महिला संस्थेचे अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्या पुढाकारातून हा स्तुत्य उपक्रम राबवण्याच भाग्य महिलांना लाभले. बंदीजणांनी स्वतःच्या कुटुंबात आनंदी राहण्यासाठी इथून पुढ गुन्हेगारीचा मार्ग सोडावा, अशी कळकळीची विनंती संस्थेच्या कार्यकर्त्या गीता भोसले यांनी केली. विनय पाटील या बंदीन या उपक्रमाबद्दल भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच आभार व्यक्त केलं. यावेळी कारागृह प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आणि बंदीजन उपस्थित होते.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.














































































