शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांना स्मृती ज्योतीने अभिवादन…

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

विनायक जितकर

शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या स्मृतिदिनी बाल स्केटिंग पट्टूंनी केले मानाच्या स्मृती ज्योतीने अभिवादन…

कोल्हापूर – स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्प संस्थापक शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या 36 व्या स्मृतीदिनानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही मानाच्या स्मृती ज्योतीचे आयोजन शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे स्केटिंग प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आले होते. प्रथम वर्षी मानाची स्मृति ज्योत पाटण येथील शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या जन्म ठिकाणाहून कोल्हापूर पर्यंत आणण्यात आली होती. त्या वर्षापासून आजतागायत आठ ऑगस्ट रोजी या स्मृती ज्योतीच्या कार्यक्रमाचे नियोजन अखंडपणे केले जात आहे.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

यावर्षीही या कार्यक्रमाची सुरुवात जुना बुधवार पेठेतील शिक्षण महर्षी डाॅ. बापूजी साळुंखे यांच्या निवासस्थानातून त्यांचे नातू प्रा. श्रीराम साळुंखे यांच्या हस्ते व त्यांच्या परिवाराच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर ही ज्योत डांगे गल्लीतील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी अभिमन्यू अर्जुन कदम यांच्या निवासस्थानी आली. त्या ठिकाणी श्रीमती शांताबाई कदम यांच्या हस्ते औक्षण करण्यात आले. यानंर भागातील बऱ्याच महिलांनी या स्मृती ज्योतिष औक्षण व अभिवादन केले त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गाने ही ज्योत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या समाधी परिसरामध्ये आणण्यात आली.

या ठिकाणी संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी मुरलीधर गावडे, आणि संस्थेचे सीईओ श्री कौस्तुभ गावडे, यांच्या हस्ते या ज्योतिस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ही ज्योत समाधीसमोर ठेवण्यात आली. ज्योती मध्ये पाच ते पंधरा वर्षाच्या आतील न्यू मॉडेल सीबीएससी स्कूलच्या मुलांनी सहभाग घेतला होता. रॅलीचे संयोजन प्रा. डॉ. महेश अभिमन्यू कदम, ॲड. धनश्री कदम, भास्कर कदम यांनी केले.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.