गांजा व बनावट सोन्याची बिस्किटे विक्रीस आलेले दोघे जेरबंद…

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

अरविंद सावरतकर

मुरगुड पोलिसांची सतर्कता छापा टाकून दोघांना पकडले…

कोल्हापूर – कापशी शेजारी असणाऱ्या बाळीक्रे (ता.कागल) येथील डुक्कर नावाच्या वड्या शेजारी गांजा सदृश्य अमली पदार्थ तसेच बनावट सोन्याची बिस्कीट विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांवर मुरगुड पोलिसांनी छापा टाकून पकडले, त्यांच्याकडून ४९ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. नारायण संभाजी पाटील उर्फ सागर पाटील वय 31 रा. कालकुंद्री, ता. चंदगड व पुष्कर पाखले रा. चाळीसगाव, जळगाव सध्या रा. ग्रँड रोड ईस्ट बेवास हॉटेल रूम नं.२०१ या दोघांच्या वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

याबाबत मुरगुड पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कापशी लिंगणुर मार्गावरील बालिक्रे येथे गांजा सदृश्य अमली पदार्थ व सोन्याची बिस्किटे विक्रीसाठी काही लोक येणार असल्याचे समजले होते. त्यानुसार मुरगूड पोलीस यांच्या शोधात बालिक्रे येथे सदर संशयित आरोपी पांढऱ्या रंगाच्या गव्हर्मेंट हरियाणा असे इंग्रजीत लिहिलेल्या पोत्यात हिरवट पाने, फुले काड्या व बिया संलग्न असलेले उग्र वासाचा गाठी झालेला ओलसर गांजा सदृश्य अमली पदार्थ सुमारे दोन किलो त्याच पद्धतीने पिवळ्या धातूचे सोन्याचे बिस्किट सारखे दिसणारे बनावट दोन बिस्किटे होती. या बिस्किटावर 100 ग्रॅम गोल्ड ९९९.० असे इंग्रजीत लिहिले होते. व मोबाईल असा एकूण 40 हजार 320 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.