विनायक जितकर
आमदार पाटील यांनी केलेल्या या मागणीवर सरकार सकारात्मक…
कोल्हापूर – कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध करून देऊ शकणारे एअरविंग हे एनसीसीच्या कोल्हापूर हेडक्वार्टरमध्ये सुरु करावे अशी मागणी विधान परिषदेतील कॉंग्रसचे गट नेते आमदार सतेज पाटील यांनी केली. आमदार पाटील यांनी केलेल्या या मागणीवर सरकार सकारात्मक असून कोल्हापूर विमान प्राधिकरणाशी चर्चा करून याबाबतचा निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही मंत्री संजय बनसोडे यांनी दिली.
![]() |
![]() |
कोल्हापुरात १९६० साली एनसीसीचे ग्रुप हेडक्वार्टर सुरु आहे. याठिकाणी २१ हजार कॅडेट कार्यरत आहेत. आर्मीच्या ८ व नेव्हीचे १ युनिट कार्यरत आहे. एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरच्या माध्यमातून आर्मी व नेव्हीचा अभ्यासक्रम शिकविला जातो. याठिकाणी एअरविंग सुरु करण्याची विनंती आहे. या क्षेत्रात खूप मोठ्या संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. कोल्हापूरात विमानतळ उपलब्ध असल्याने एअरविंग एनसीसी सुरु करण्याची मागणी होत आहे. तत्कालीन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा केला होता.
हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित असून याबाबत सरकार काय कारवाई करणार असा प्रश्न आमदार पाटील यांनी विचारला यावर शासनाच्या वतीने मंत्री संजय बनसोडे यांनी उत्तर देताना या विषयी शासन सकारात्मक असल्याचे सांगितले. कोल्हापूर विमान प्राधिकरणाशी चर्चा करून याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असे त्यानी स्पष्ट केले.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.














































































