कोल्हापुरात धाडसी चोरी… तब्बल तीन तास चोरांचा बंगल्यात वावर…

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

रुईकर कॉलनी परिसरात बंगल्यात प्रवेश करून २० तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 15 हजारांची रोकड लंपास…

कोल्हापुरातील रुईकर कॉलनी परिसरात असणाऱ्या एका बंगल्यात काल मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरांनी प्रवेश करत वीस तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 15 हजार रुपयांची रोकड आणि दुचाकी घेऊन पसार झाले आहेत. रुईकर कॉलनीतील निरंजन वायचळ यांच्या बंगल्यात सुरज हिराप्पा सुतार हे भाड्याने राहतात. काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घराच्या खिडकी तोडून घरात प्रवेश केला यावेळी घरामध्ये सुरज सुतार हे आपल्या पत्नी, मुलगी आणि भाच्यासह बंगल्यातील एका रूममध्ये झोपले होते. चोरट्यांनी बंगल्याची खिडकी चे ग्रिल उचकटून प्रवेश केला.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

बंगल्यातील एका रूममधील कपाटातील साहित्य विस्कटून कपाटात असणारे सुमारे 20 तोळे सोन्याचे दागिने आणि पंधरा हजारांची रोकड लंपास केली तब्बल तीन तास चोरटे या बंगल्यात वावरत होते. बंगल्याच्या परिसरामध्ये चोरट्यांनी सौच देखील केला आहे. यानंतर त्यांनी त्या बंगल्यातील सुतार यांची मोपेड घेऊन पसार झाले. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सुरज सुतार आणि कुटुंबीय उठल्यानंतर त्यांना बंगल्यात चोरी झाल्याचं निदर्शनास आलं त्यानंतर त्यांनी तात्काळ शाहूपुरी पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला याबाबतची माहिती दिली.याठिकाणी ठसे तज्ञ आणि श्वान पथक देखील दाखल झाले आहेत. सध्या पोलीस या परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे या चोट्यांचा शोध घेत आहेत.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.