मुख्यमंत्री लक्ष देतील का? पत्रकारांना न्याय मिळेल का?राजकीय गुंडांवर पत्रकार सुरक्षा कायद्यानुसार कारवाई व्हावी-शीतल करदेकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

सोमय्या मैदानात पत्रकाराला मारहाण करणाऱ्या राजकीय गुंडांवर  पत्रकार सुरक्षा कायद्यानुसार कारवाई व्हावी

-शीतल करदेकर (मीडिया असोसिएशन ऑफ  ऑफ इंडिया)

चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानात १३ मे रोजी मुंबई महानगर पालिकेच्या महिला स्वयंरोजगार  योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात आसपासच्या परिसरातील महिला  उपस्थित राहणार होत्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा उपमुख्यमंत्री ने देवेंद्र फडणवीस येणार असल्यामुळे चांगला प्रतिसाद मिळणार हे गृहित होत!मात्र सरकारने मध्यंतरी की दुपारी १ ते ४या वेळेत उन्हाचा तडाका जास्त असतो म्हणून कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम उघड्या मैदानात  घेऊ नये असा जीआर काढला होता !या कार्यक्रमासाठी महिला दुपारी दीड  दोन वाजल्यापासून आल्या होत्या  आणि त्या मुख्यमंत्री येण्याच्या दरम्यानच संध्याकाळी कंटाळून निघाल्याने  याचे चित्रण काही पत्रकार करत होते! टीव्ही ९ मराठीचा प्रतिनिधी नेमका स्थानिक आमदार कार्यकर्त्यांनी पाहिला,त्याचा कॅमेरा खेचून रेकॉर्डिंग चिप काढून घेऊन  मारहाण केली.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

काही वेळात तिथे पोलीस आल्यामुळे पुढचा अनर्थ टळला! चॅनलच्या प्रतिनिधींना मारण्याचे कारण काय आणि मुळात दुपारपासून महिलांना  तिष्ठत का ठेवले? कंटाळून निघालेल्या महिलांचा दोष नव्हता आणि ते चित्रीकरण करणे हा त्या पत्रकाराचे दोष नव्हता! मग असं असताना त्या पत्रकाराला मारहाण करणे हे समाजविघातकच  आणि म्हणून या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो?तसेच ज्या चॅनलचे ते प्रतिनिधी आहेत त्या चॅनेलनी साधी बातमी ही आपल्या चैनल वर दाखवली नाही आणि निषेधही व्यक्त नाही केला !जर त्या पत्रकाराने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली तर ही वृत्तवाहिनी त्याला किती आणि कशी मदत करेल शंका आहे आणि अशी दाट शक्यता असते की अशा प्रकारात  त्या बिचा-या पीड़िताला  आपली  नोकरी टिकवणे अत्यावश्यक असते! 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जनहितार्थ काम करण्यासाठी मैदानात उतरले आहेत मात्र त्यांचे  मुजोर कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी हे जर आपला राग पत्रकारांवर काढण्यासाठी हात उचलत असतील तर हे अत्यंत निंदनीय आहे आणि म्हणून आमची अशी मागणी आहे की या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई पत्रकार सुरक्षा कायद्यानुसार करावी! अशी मागणी मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर यानी ट्विटर द्वारे आणि इतर समाजा माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे! तसेच आपल्या  प्रतिनिधीची  कामाच्या वेळी जबाबदारी घेण्याचे भान  माध्यम व्यवस्थापनाला  जास्त असलीच पाहिजे  ही चर्चा या  निमित्ताने  ऐरणीवर आली आहे! 

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.