शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बाजार समिती ची निवडणूक लढविणार

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

निवडणूक बिन विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यानी कंबर कसली आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे नगारे वाजले आहेत ही निवडणूक बिन विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यानी कंबर कसली आहे. मात्र ही निवडणूक बिन विरोध करताना आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर चर्चा केली नाही किंवा त्याना विश्वासात घेतले नाही त्यामुळे या पक्षाने बाजार समितीची ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

पक्ष कार्यकत्याच्या आज सर्किट हाऊस येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला उद्या गुरुवारी पॅनेलची घोषणा करण्यात येणार आहे आज झालेल्या बैठकीस जिल्हा प्रमुख संजय पोवार विजय देवणे शहर प्रमुख सुनील मोदी तसेच तानाजी आंग्रे उदय सुतार सुरेश चौगले डॉ. अनिल पाटील, चंद्रकांत पाटील कौलवकर आदी शिवसैनिक उपस्थित होते इच्छुक उमेदवारांनी गुरुवारी सकाळी सर्किट हाऊस येथे उपस्थित राहावे असे आवाहन सुनील मोदी यांनी केले आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.