गीत रामायणात रंगले काेल्हापूरकर…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

खासदार धनंजय महाडिक आणि चॅनेल बी च्या पुढाकारातून आयोजित केलेल्या गीत रामायणाच्या 

मैफिलीला कोल्हापुरकरांचा उदंड प्रतिसाद

भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून रविवारी सायंकाळी कोल्हापुरात गीतरामायणाचा कार्यक्रम संपन्न झाला. ज्येष्ठ गायक श्रीधर फडके यांचा मखमली स्वर आणि रामायणाच्या संगीतामुळं रसिक श्रोते तल्लीन झाले. या मैफिलीच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्वर्गीय ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या आठवणी जाग्या झाल्या. या सांस्कृतिक पर्वणीला कोल्हापुरच्या रसिकांनी उंदड गर्दी केली होती.

राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, चॅनेल बी चे चेअरमन पृथ्वीराज महाडिक, भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक आणि चॅनेल बी च्या पुढाकारातून रविवारी सायंकाळी केशवराव भोसले नाटयगृहात गीत रामायणाचा कार्यक्रम सादर झाला. स्वर्गीय ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या अलौंकिक प्रतिभेतून साकारलेला गीतरामायणाच्या स्वरांचा अनमोल नजराणा अनुभवण्यासाठी रसिकांनी मोठी गर्दी केली होती.

प्रारंभी भागिरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक, सौ. वैष्णवी महाडिक, गायक श्रीधर फडके, भंडारी ग्रुपचे विजय भंडारी, नामदेव भंडारी, वेलनेस मेडिकलचे विभागीय व्यवस्थापक राजेंद्र सन्स, मार्केटिंगचे सौरभ कडू यांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले. प्रभू श्रीरामांच्या प्रतिमा पूजनानंतर, गायक श्रीधर फडके, भंडारी ग्रुपचे विजय भंडारी, नामदेव भंडारी, वेलनेस मेडिकलचे राजेंद्र सणस, सौरभ कडू या प्रायोजकांचा सौ.अरुंधती महाडिक आणि सौ. वैष्णवी महाडिक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. रामनवमीचे औचित्य साधून खासदार धनंजय महाडिक यांनी रसिकांसाठी हा कार्यक्रम मोफत आयोजित केला होता. यापुढेही कलानगरीसाठी अशाच दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले.

परीक्षा पे चर्चा .. काेल्हापुरात खासदार धनंजय महाडिक यांनी साधला असा संवाद! विद्यार्थ्यांमध्ये वाढली आत्मविश्‍वासाची भावना…

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.