घुणकी WATCH TEAM : भारतीय संविधान दिनानिमित्त घुणकी येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.कार्यक्रमात संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत मधील वरिष्ठ लिपीक प्रदीप मोहिते यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व विशद केले. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता ही मूल्ये दिली असून, संविधानातील तत्त्वांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमात संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी संविधानाविषयी मनोगत व्यक्त केले. संविधानाने दिलेले अधिकार आणि कर्तव्ये यांची जाणीव प्रत्येकाने ठेवावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.या कार्यक्रमाला लोकनियुक्त सरपंच सौ सुजाता जाधव, उपसरपंच संदीप केर्ले, ग्राम सदस्य रमेश पाटोळे, सचिन कांबळे, कार्यक्रमाचा समारोप आभार कृष्णात यांनी आभार मानले.
























