कोल्हापूर | WATCH TEAM
सणासुदीच्या काळात इतरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे हीच खरी दिवाळी असते. हीच सामाजिक बांधिलकी जपत खासदार धनंजय महाडिक यांच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या तब्बल २१० कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त नवीन कपड्यांची भेट देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला. सौ. अंजली विश्वराज महाडिक यांच्या हस्ते सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत या कपड्यांचे वाटप करण्यात आले.

खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. यंदाच्या दिवाळीतही हा उपक्रम अविरत सुरू ठेवण्यात आला. यापूर्वी सोमवारी कसबा बावडा येथील राजाराम कारखाना कार्यस्थळावरील कष्टकरी ऊस तोडणी कामगारांना फराळ आणि नवीन कपडे देऊन त्यांची दिवाळी गोड करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये अहोरात्र सेवा बजावणाऱ्या २१० कर्मचाऱ्यांसाठी हा स्नेहपूर्ण उपक्रम पार पडला.
यावेळी सौ. अंजली विश्वराज महाडिक यांच्या हस्ते पुरुष कर्मचाऱ्यांना शर्ट व पॅन्ट पीस, तर महिला कर्मचाऱ्यांना साडीचे वितरण करण्यात आले. आपल्या कामाची दखल घेऊन दिवाळीची भेट मिळाल्याने कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसून येत होता. याप्रसंगी देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्यासह सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📍 सकारात्मक आणि समाजोपयोगी बातम्यांसाठी पाहत राहा: पॉझिटिव्ह वॉच (शासन मित्र – पोलीस मित्र – समाज मित्र)