कोल्हापूर | WATCH TEAM
शहरात विनापरवाना व्यवसाय थाटणाऱ्या आस्थापनांविरोधात कोल्हापूर महानगरपालिकेने आता ‘ॲक्शन मोड’वर येत कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिकेच्या संयुक्त पथकाने जरगनगर येथील योगेश्वरी कॉलनी आणि जगतापनगर परिसरात धडक कारवाई करत विनापरवाना सुरू असलेल्या ‘जॅग्वार जिम’ला (Jaguar Gym) सील ठोकले आहे. यासोबतच, याच परिसरातील विनापरवाना सुरू असलेल्या ‘ओयो लॉजिंग’ (OYO Lodging) व्यावसायिकास ६ दिवसांची अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे.

नोटिसांकडे दुर्लक्ष केल्याने थेट सीलची कारवाई:
महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या निर्देशानुसार आणि उपायुक्त किरणकुमार धनवाडे, सहायक आयुक्त उज्वला शिंदे व करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. संबंधित आस्थापनांना नवीन व्यवसाय परवाना घेणे आणि आवश्यक भाडेकरार सादर करण्याबाबत महापालिकेकडून यापूर्वीच नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर परवाना, घरफाळा, विभागीय कार्यालय क्रमांक १ (गांधी मैदान) आणि उपद्रव शोध पथकाने संयुक्तपणे ही सीलबंद कारवाई केली.

थकबाकीदार आणि विनापरवाना व्यावसायिक रडारवर:
शहरातील थकीत घरफाळा भरणे, कर आकारणीतील त्रुटी दूर करणे आणि व्यवसाय परवाना घेण्याबाबत महापालिकेकडून नोटिसा बजावणे सुरू आहे. यापुढेही विनापरवाना व्यवसाय आणि घरफाळा थकबाकीदारांविरोधात ही धडक मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. तरी सर्व मिळकतधारक व व्यावसायिकांनी आपली थकीत रक्कम आणि आवश्यक परवान्यांची पूर्तता तातडीने करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

या कारवाईत परवाना अधीक्षक दत्तप्रसाद माजगावकर, परवाना निरीक्षक शिवाजी कोकरे, उदय भोसले, घरफाळा लिपिक संतोष आवळे, सागर गायकवाड, प्रवीण भोसले, चंदू पाटील आणि उपद्रव शोध पथकाचे जवान विलास पाटील, संतोष रानमाळे, शिवाजी कुंभार आदींनी सहभाग घेतला.
📍 ताज्या आणि अचूक बातम्यांसाठी पाहत राहा: पॉझिटिव्ह वॉच (शासन मित्र – पोलीस मित्र – समाज मित्र)