|
पश्चिम महाराष्ट्रातील पोलीस कुटुंबांच्या निवासाचा प्रश्न ऐरणीवर; शासन दरबारी सातत्याने प्रयत्न सुरू कोल्हापूर WATCH TEAM : जनतेच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांच्या कुटुंबांनाही हक्काचे घर मिळावे, यासाठी आता पश्चिम महाराष्ट्रात प्रयत्न सुरू झाले आहेत. पोलिसांच्या निवासाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. पोलीस कर्मचारी सण-उत्सव, आपत्ती आणि कठीण परिस्थितीतही जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात. मात्र, अनेक पोलीस कुटुंबांसमोर स्वतःच्या हक्काच्या घराचा प्रश्न कायम आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलीस परिवाराच्या निवासाचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. या मागणीसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल भैया दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सादिक अब्दुल अत्तार यांच्या नेतृत्वाखाली शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती देण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रातील पोलीस कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, त्यांच्या निवासाचा प्रश्न सुटावा आणि कुटुंबांना सुरक्षिततेची भावना मिळावी, हा या प्रयत्नांचा मुख्य उद्देश आहे. लवकरच या प्रयत्नांना यश मिळेल आणि पोलीस परिवारांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सादिक अब्दुल अत्तार यांनी व्यक्त केला. |

























