कुर्डूवाडी-माढ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; बबनदादा, संजयमामांचा पाठिंबा

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

माजी आमदार बबनदादा शिंदे व संजयमामा शिंदे यांचा पाठिंबा; शिक्षकांच्या भेटींमुळे प्रचाराला वेग

कुर्डूवाडी-TEAM WATCH : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप–महायुतीचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचाराने कुर्डूवाडी-माढा परिसरात वेग घेतला आहे. माजी आमदार बबनदादा शिंदे आणि संजयमामा शिंदे यांनी गावडे यांना जाहीर पाठिंबा दिल्याने प्रचाराला बळ मिळाले आहे.

या प्रचारादरम्यान विविध शाळा व महाविद्यालयांतील शिक्षकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सेवाविषयक समस्या, जुनी पेन्शन योजना, विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न, सेवासुरक्षा आणि अशैक्षणिक कामांचा भार यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

कुर्डूवाडी परिसरातील जिव्हाळा सुसंस्कार मंदिर, आंतरभारती विद्यालय, नूतन विद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाला, महात्मा ज्योतिबा फुले ज्युनिअर कॉलेज, आदर्श पब्लिक स्कूल, डॉ. नेताजी करळे पब्लिक स्कूल तसेच भोसरी येथील विनायकराव पाटील हायस्कूल येथे शिक्षकांच्या भेटी घेण्यात आल्या.

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांना विधान परिषदेत प्रभावी व्यासपीठ मिळवून देण्यासाठी अभ्यासू नेतृत्वाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या भेटींमुळे परिसरातील प्रचाराला गती मिळत असून, शिक्षकांशी संवाद साधण्यावर भर दिला जात आहे.

या उपक्रमात सोलापूर जिल्हा निवडणूक प्रचारप्रमुख प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, जयप्रकाश पाटील, दिलावर मुलानी, सुनीलतात्या नलवडे, मल्लाव सर, संजय कोयले, प्रा. डॉ. मच्छिंद्र नागरे, प्रा. प्राची जगताप, प्रा. करण पाटील, प्रा. मालोजी पवार, प्रा. ज्योतिर्लिंग क्षीरसागर आणि आकाश गोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

​

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.