२० परवान्यांचे नूतनीकरण..नवीन परवान्यासाठी १५ अर्ज दाखल-शिबिराला प्रतिसाद

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

सराफ व्यावसायिकांसाठी व्यवसाय परवाना

कोल्हापूर TEAM WATCH : कोल्हापूर महानगरपालिकेच्या परवाना विभागामार्फत महाद्वार रोड येथील कोल्हापूर सराफ असोसिएशनच्या सभागृहात सराफ व्यावसायिकांसाठी नवीन व्यवसाय परवाना व परवाना नूतनीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला व्यावसायिकांचा प्रतिसाद मिळाला. नवीन व्यवसाय परवान्यासाठी १५ अर्ज दाखल झाले असून, २० व्यावसायिकांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आले. तसेच अन्य २० व्यावसायिकांना आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

कोल्हापूर सराफ असोसिएशनच्या मागणीनुसार आज सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आलेले हे शिबिर उपआयुक्त किरण कुमार धनवाडे व सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, किरण नकाते तसेच सराफ असोसिएशनचे संचालक उपस्थित होते. व्यावसायिकांना व्यवसाय परवाना मिळविण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, तसेच परवान्यांचे नूतनीकरण वेळेत करता यावे, या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात परवाना अधीक्षक अशोक यादव, परवाना निरीक्षक संदीप भोई, भोलानाथ पाटणकर यांच्यासह परवाना विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.