ही परिस्थिती आणीबाणीपेक्षाही वाईट!”; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर आंदोलनाचा एल्गार, सीजेपीचे अभिजीत दिपके यांची खरमरीत टीका

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

मुंबई:TEAM WATCH
“मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह तीन मागण्यांवर अजिबात समझोता केला जाणार नाही. या मागण्यांसाठी शनिवारी नवी दिल्लीत जंतर-मंतरवर आयोजित करण्यात आलेले आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशातील नागरिकांच्या विरोधात जणू काही युद्ध पुकारल्याचे चित्र आहे. ही परिस्थिती आणीबाणीपेक्षाही वाईट आहे,” अशी खरमरीत टीका कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके यांनी केली आहे. पोलिसांनी कितीही आडकाठी आणली तरी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन होणारच, असा निर्धार त्यांनी ‘एका कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केला.
दिल्लीला छावणीचे रूप; रेल्वे-मेट्रो बंद करण्यावरून हल्लाबोल
जंतर-मंतरवरील सीजेपीच्या आंदोलनामुळे राजधानी नवी दिल्लीची जणू काही तटबंदी करण्यात आली असून, हे आंदोलन रोखण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना दिपके म्हणाले, “केंद्र सरकारला देशातील स्वतःच्याच लोकांची भीती वाटत असावी, म्हणूनच दिल्ली पोलीस, जम्मू-काश्मीर पोलीस आणि निमलष्करी दलाला पाचारण करण्यात आले आहे. लोकांची नाराजी दूर करण्यासाठी पावले उचलण्याऐवजी रेल्वे आणि मेट्रो सेवा बंद करून लोकांच्या अडचणीत भर घातली जात आहे. आणीबाणीच्या काळातही किमान रेल्वे गाड्या वेळेत धावत होत्या, मात्र स्वातंत्र्यानंतर लोकांच्या आंदोलनाच्या भीतीने रेल्वे गाड्या बंद करण्याचा निर्णय प्रथमच घेण्यात आला आहे.”
आंदोलकांवरील कारवाईबाबत तीव्र आक्षेप
शिवाजी पार्कवरील सभेला परवानगी नाकारताना लोकांना त्रास होईल असे कारण दिले गेले होते, मग दिल्लीतील रस्ते आणि मेट्रो बंद केल्याने लोकांना त्रास होत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. लोकशाहीत नागरिकांच्या अधिकाराचा आदर करण्याऐवजी सरकार त्यांना शत्रूराष्ट्रातील नागरिकांप्रमाणे वागणूक देत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, २०११ सालच्या आंदोलनांचा दाखला देत त्यांनी सध्याच्या प्रशासकीय पद्धतींवर दडपशाहीचा आरोप केला. यापूर्वीच्या आंदोलनांत लहान मुले आणि १५ वर्षांच्या मुलींना मारहाण झाल्याचे सांगत त्यांनी यंत्रणेच्या पाशवी वर्तणुकीवर तीव्र विषाद व्यक्त केला.
निधीची अडचण आणि न्यासाची नोंदणी
पक्ष चालवण्यासाठी निधीचा मोठा प्रश्न असल्याचे सांगताना, दिल्लीत न्यास (Trust) म्हणून नोंदणी करण्यासाठी अर्ज केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, ही नोंदणी प्रक्रिया अद्याप का रखडली आहे, याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
‘या’ तीन प्रमुख मागण्यांवर सीजेपी ठाम
अभिजीत दिपके यांनी पक्षाच्या तीन मुख्य मागण्यांवर कोणताही समझोता करणार नसल्याचे स्पष्ट केले:
    1. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा तातडीने राजीनामा.

    2. मतदारयाद्यांची विशेष सखोल फेरतपासणी (SIR) प्रक्रिया रद्द करून २०२५ च्या मतदारयाद्या ग्राह्य मानल्या जाव्यात.
    3. मुख्य निवडणूक आयुक्त आणि आयुक्तांच्या निवड प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणली जावी.

प्रशासकीय दबावाला न जुमानता आणि पोलिसांच्या सर्व आडकाठ्या पार करून शनिवारचे हे आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार सीजेपीने व्यक्त केला असून, आता राजधानीतील या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.