‘मनकर्णिका कुंड’ भाविकांसाठी लवकरच खुले होणार; आमदार राजेश क्षीरसागर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कोल्हापूर-TEAM WATCH : आई अंबाबाईच्या दर्शनासाठी जगभरातून लाखो भाविक कोल्हापुरात येत असतात. शारदीय नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होत, “या देशातील तमाम जनतेला सुखी ठेव”, असे साकडे घातले.

यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांनी अंबाबाई मंदिर परिसरातील प्राचीन, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक मनकर्णिका कुंडाच्या सुरू असलेल्या संवर्धन व उत्खनन कामाची पाहणी केली. मनकर्णिका कुंडाचा ऐतिहासिक ठेवा लवकरात लवकर भाविकांसाठी खुला करावा, तसेच या कुंडाच्या संवर्धनासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशा सूचना त्यांनी देवस्थान समितीचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींना दिल्या.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
“ज्या मनकर्णिका कुंडाचा ऐतिहासिक ठेवा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला होता, तोच ठेवा आज उत्खननातून पुन्हा समोर येत आहे. हा इतिहास जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे संवर्धनाचे काम अत्यंत दर्जेदार आणि शास्त्रोक्त पद्धतीने झाले पाहिजे. ऐतिहासिक कुंडाचे जतन व संवर्धन करण्यासाठी सुरू असलेल्या कामाला गती द्यावी. हे कुंड पाहण्यासाठी आलेल्या भाविकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणीना सामोरे जावे लागू नये, याकरिता आवश्यक उपाययोजना आताच आराखड्यात समाविष्ठ कराव्यात कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई करू नये. मनकर्णिका कुंड हे केवळ एक प्राचीन जलस्थळ नसून कोल्हापूरच्या धार्मिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वैभवाचा महत्त्वपूर्ण ठेवा आहे. त्यामुळे त्याचे संवर्धन करून हा परिसर भाविक आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनविण्याच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे”, अशा स्पष्ट सूचना आमदार क्षीरसागर यांनी यावेळी दिल्या.

प्राचीन, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक मनकर्णिका कुंड बुजवण्याचे पाप तत्कालीन प्रशासनाने केले होते. या ऐतिहासिक ठेव्यावर शौचालय उभारून तो नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मनकर्णिका कुंड पुनर्जीवित करून हा ऐतिहासिक ठेवा भाविकांसमोर आणावा, यासाठी सन २०१६ मध्ये विधानभवनात आपण आवाज उठविला होता. मात्र, त्यानंतरही कोणतीही कार्यवाही न झाल्याने जून २०१६ मध्ये माझ्यासह शिवसैनिक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आयोध्येतील बाबरीप्रमाणेच कारसेवा करून हे शौचालय पाडले, असे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

त्यानंतर प्रशासनाने या ठिकाणी उत्खननास सुरुवात केली. या उत्खननात अनेक प्राचीन मूर्ती, शिलालेख, वास्तूंचे अवशेष आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या बाबी आढळून आल्या आहेत. त्यामुळे शिवसैनिक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केलेल्या कारसेवेमुळे हा ऐतिहासिक ठेवा पुन्हा जनतेसमोर आला, याचा आनंद असल्याचे आमदार क्षीरसागर यांनी व्यक्त केले.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.