शिक्षक मतदारसंघ निवडणूक : कौस्तुभ गावडे यांना ‘जुनी पेन्शन समन्वय संघा’चा जाहीर पाठिंबा!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
                   प्रलंबित प्रश्नांसह जुनी पेन्शन लागू करण्यासाठी प्रभावी पाठपुराव्याची गावडे यांची ग्वाही…………….
कोल्हापूर : TEAM WATCH
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीतील भारतीय जनता पक्ष-महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाने आपला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रश्नांना विधान परिषदेत प्रभावी व्यासपीठ मिळावे, तसेच जुनी पेन्शन योजनेच्या कायदेशीर मागणीला बळ मिळावे, या दृष्टीने या पाठिंब्याला राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. कौस्तुभ गावडे यांच्या जाहीरनाम्यातील पहिल्याच प्रमुख मुद्द्याला या संघटनेने पाठिंबा दिल्याने त्यांची निवडणुकीतील ताकद कमालीची वाढली आहे.
वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत घोषणा
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, खासदार धैर्यशील पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार भीमराव तापकीर, संजय जगताप, निवडणूक सहप्रमुख डॉ. प्रशम कोल्हे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीपदादा कुंद यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पाठिंबा जाहीर करण्यात आला. भारतीय जनता पक्ष (BJP) च्या या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत नागपूरहून आलेले कडू सर यांनी विश्वास व्यक्त केला की, कौस्तुभ गावडे हे केवळ पुणे विभागापुरते मर्यादित नसून ते जुनी पेन्शन समस्येबाबत संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांचे सक्षम नेतृत्व करत आहेत.
शिक्षकांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी कटिबद्ध : गावडे
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना कौस्तुभ गावडे म्हणाले, “जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सातत्याने लढा देणाऱ्या शिक्षक आणि कर्मचारी बांधवांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला, ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. जुनी पेन्शन हा केवळ निवृत्तीनंतरच्या आर्थिक लाभाचा विषय नसून शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित अत्यंत संवेदनशील प्रश्न आहे. शिक्षकांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ शिक्षणव्यवस्थेच्या उभारणीसाठी समर्पित केलेला असतो, त्यामुळे त्यांच्या भविष्याची सुरक्षितता सुनिश्चित होणे आवश्यक आहे. या मागणीबाबत शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घडवून आणण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.”
हा महत्त्वपूर्ण पाठिंबा जाहीर करताना समन्वय संघाचे पदाधिकारी सुभाष माने, तानाजी माने, नंदकुमार सागर, प्रसाद गायकवाड, संजयकुमार झांबरे, सचिन नलवडे, दत्ता पाटील, बाबा पाटील, संदेश राऊत, विजय येवले, सुधारक जगदाळे, शशिकांत शिंदे, रामचंद्र मोहिते, भरत मोजर, देविदास कठाळे आणि दत्तात्रय घुगरे यांच्यासह अनेक शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.