७० लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी दोन मुख्य आरोपींना अटकपूर्व जामीन : ॲड भारत सोनुले यांचा युक्तिवाद ठरला सरस
कोल्हापूर :- मृत पतीचे विम्याचे आणि पीएफ चे ७० लाख रुपये फिर्यादी असलेल्या पत्नीचे नावे बँकेत जमा झाले होते. सदर पैसे बँकेतील शाखा अधिकारी यांचेशी संगनमत करून फिर्यादी यांची सासू व बँक कर्मचारी असलेल्या दीर यांनी फसवणूक करून ४ एप्रिल ते १५ जुलै २०२५ मध्ये घेतले होते असा आरोप फिर्यादीत केला होता.
या अनुषंगाने शाहूपुरी पोलिस ठाण्यात प्रथमवर्ग न्यायालयाने चौकशीचे आदेश दिल्याने पोलिसांनी सासू भारती आणि दीर अनिरुद्ध यांचेविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यातील फिर्यादीचे कोऱ्या कागदपत्रांवर आणि फॉर्म वर फसवणुकीच्या उद्देशाने सह्या घेतल्या होत्या असा आरोप करण्यात आला होता.
या प्रकरणी दोन्ही आरोपींचे वतीने ॲड भारत सोनुले यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश सो कोल्हापूर यांचेकडे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. सदरच्या जामीन अर्जावर दि १४ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा न्यायाधीशसो कोल्हापूर यांचे कोर्टात सुनावणी झाली.
सुनावणी दरम्यान सरकार पक्षाने आरोपीविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल असून गुन्ह्यातील फसवणूक करून घेतलेली रक्कम ५० लाख रुपये आरोपीकडून जप्त करणे बाकी आहे. आरोपी विरुद्ध प्रथमदर्शी कागदोपत्री पुरावा असल्याने तसेच सदरचा तपास प्राथमिक अवस्थेत असल्याने अटकपूर्व जामीन देण्यात येऊ नये अशी ठाम भूमिका घेण्यात आली होती.
परंतु आरोपीचे वकील ॲड भारत सोनुले यांनी याप्रकरणी फिर्यादी व आरोपींचे कौटुंबिक वाद असून आर्थिक बाबतीत दिवाणी दावे सुरू आहेत. तसेच फिर्यादीने २०२३ साली केलेल्या तक्रारीत आरोपींनी पोलिसांना तपास कामी हजर राहून सहकार्य केले होते. पुनः केवळ गुन्हा दाखल झाल्याने तपासाचे स्वरूप बदलनार नाही. फिर्यादीने आर्थिक लाभा करिता सदरची फिर्याद दाखल केल्याचा युक्तिवाद केला. आरोपींचे बाजूने ॲड सोनुले यांनी उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे आणि एकूण १५ कागदपत्रे हजर करण्यात आली होती.

सदरची कागदपत्रे आणि आरोपीचे वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून मा. जिल्हा न्यायालयाने दि १९ ऑगस्ट २०२६ रोजी सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी भारती पाटील आणि अनिरुद्ध पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अटी व शर्ती सह मंजूर केला आहे.
याप्रकरणी आरोपीचे वतीने ॲड भारत सोनुले, ॲड प्रिती देवर्डेकर, ॲड सरोज देसाई,ॲड स्नेहलता यादव, ॲड स्वालेहा नालबंद, ॲड आकाश साठे, ॲड वृषाली इंगळे यांनी काम पाहिले.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.











































































