बैठकीत सकारात्मक निर्णय, तातडीची कामे महापालिके कडून तर अन्य कामे आमदार निधीतून करणेचा निर्णय…
इचलकरंजी – आमदार राहुल आवाडे यांच्या पुढाकाराने आणि महापौर उदय धातुंडे, आयुक्त पल्लवी पाटील, उपमहापौर अनिल डाळ्या, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांच्या प्रमुख उपस्थितीत इचलकरंजी शहरातील लिंगायत समाजाच्या विविध सामाजिक प्रश्न व मागण्यां बाबत बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीत समाजाशी संबंधित सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, प्रलंबित प्रश्न सोडविण्यासं दर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
बैठकीत सांगली रोडवरील महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय सभागृह व उद्यानामध्ये महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा उभारणे तसेच सदर उद्यान परिसर विकास, काळा ओढा परिसरातील जुन्या स्मशान भूमीतील अडचणी, निरामय हॉस्पिटल शेजारील नवीन स्मशानभूमीतील आवश्यक सुविधा तसेच लिंगायत समाजाच्या अन्य सामाजिक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी प्रशासनाच्या वतीने तातडीने पूर्ण करता येणारी कामे इचलकरंजी महानगरपालिके मार्फत त्वरित हाती घेण्यात येतील, असे आयुक्त पल्लवी पाटील यांचेकडून स्पष्ट करण्यात आले. तर मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद आवश्यक असलेली इतर विकासकामे आमदार निधीतून टप्प्या टप्प्याने पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन आमदार राहुल आवाडे यांनी दिले. बैठकीतील चर्चेनंतर संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, समाजाच्या मागण्यांना प्राधान्य देत विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे.त्यामुळे लिंगायत समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांच्या सोडवणुकीला गती मिळण्याची मिळणार आहे.
या बैठकीस परिवहन सभापती अरुणा बचाटे, शिक्षण सभापती विद्या साळुंखे, महिला बालकल्याण सभापती रुपाली सातपुते, समिती सभापती सुशांत कलागते, नगरसेवक राजू बोंद्रे, योगेश पाटील, प्रकाश दत्तवाडे, माजी नगरसेवक युवराज माळी, दत्ता मांजरे, प्रमोद बचाटे, सचिन माळी, गजाननराव सुलतानपुरे, अनिल स्वामी, विलास गाताडे, उपायुक्त नंदु परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परिक्षक आरती खोत, सहा.आयुक्त रोशनी गोडे, शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर आदिंसह लिंगायत समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.











































































